शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

साताऱ्यात उद्योजकाची १७ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल 

By दत्ता यादव | Updated: March 25, 2023 15:42 IST

ऑईलचा टँकर देण्याच्या बहाण्याने घातला गंडा

सातारा : ऑईलचा टँकर देण्याच्या बहाण्याने एका उद्योजकाची तब्बल १७ लाख ६४ हजार ५६० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. युवराज किसन कांबळे (रा. मुंबई), अल्लाबक्क्षी फखरुसाब चपाती (फिर्यादीला पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलेश मधूकर पवार (वय ४१, रा. आशीर्वाद काॅलनी, देगाव रोड, एमआयडीसी, सातारा) यांची साताऱ्यातील एमआयडीसीत ट्रेडिंग कंपनी आहे. वरील संशयितांनी पवार यांना विश्वासात घेऊन त्यांना फसविण्यासाठी कट रचला. भरलेला ऑईल टॅंकर देतो, असे सांगून मोकळ्या ऑईल टॅंकरची व त्यानंतर भरलेल्या ऑईल टॅंकरची खोटी पावती त्यांच्या व्हाँट्सअॅपवर पाठविली. त्यानंतर पवार यांनी संबंधितांना १७ लाख ६४ हजार ५६० रुपयांची रक्कम पाठविली. मात्र, त्यांनी ऑईलचा टॅंकर त्यांना दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी वरील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.   

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस