शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: धमकीला घाबरून १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या, तिघांवर गुन्हा; मलकापुरातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 12:05 IST

मारहाण करून दिली ठार मारण्याची धमकी

कऱ्हाड : ठार मारण्याची धमकी देऊन सोळा वर्षीय मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुमन शामराव सोनवणे (रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर, मलकापूर) यांनी फिर्याद दिली आहे.करण थोरात, सचिन अण्णाप्पा दरागडे, सुमन अण्णाप्पा दरागडे (सर्व रा. हनुमान मंदिराशेजारी, दांगट वस्ती, मलकापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, तर सतीश शंकर सोनवणे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर दांगट वस्ती येथील सुमन सोनवणे यांचा नातू सतीश सोनवणे हा मंगळवारी दुपारी दांगट वस्तीत असलेल्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. त्यावेळी करण थोरात हा माझ्यासोबत दारू प्यायला चल, असे त्याला म्हणाला. मात्र, सतीशने त्याला नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन करण थोरात याने सतीशला शिवीगाळ, दमदाटी करीत त्याच्या चोचरे बोलण्यावरून टिंगलटवाळी केली. त्यामुळे सतीशने त्याला शिव्या दिल्या. याचा राग मनात धरून करण, त्याचा मामा सचिन दरागडे आणि आजी सुमन दरागडे या तिघांनी सतीशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सतीश तेथून पळत घराकडे निघून गेला. काही वेळानंतर तिन्ही आरोपी सतीशच्या घरासमोर आले. त्यांनी त्याला पुन्हा शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच तू घरातून बाहेर पडलास की तुला जिवंत ठेवणार नाही, तुला मारून टाकणार, असे म्हणून त्यांनी धमकी दिली. या सर्वांपासून थोडे दूर राहावे म्हणून त्याला एकट्याला घरात थांबण्यास सांगितले आणि त्याने गळफास घेऊन जीवन संपविले.कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ठार मारण्याची धमकी देऊन सतीशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुमन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे.

बचावासाठी एकट्याला सोडले अन् घात झालासुमन सोनवणे यांनी नातू सतीशला आतल्या खोलीत जायला सांगून आराम करण्यास सांगितले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सुमन यांनी आतल्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता सतीशने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे त्यांना दिसले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस