जिल्हा परिषदेत होणार १४ अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:59+5:302021-09-23T04:44:59+5:30

सातारा : जिल्हा परिषदेत गुरुवार, दि. २३ रोजी दुपारी बदली झालेल्या व नवीन पदभार स्वीकारलेल्या १४ अधिकाऱ्यांचा सत्कार होणार ...

14 officers to be felicitated in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत होणार १४ अधिकाऱ्यांचा सत्कार

जिल्हा परिषदेत होणार १४ अधिकाऱ्यांचा सत्कार

सातारा : जिल्हा परिषदेत गुरुवार, दि. २३ रोजी दुपारी बदली झालेल्या व नवीन पदभार स्वीकारलेल्या १४ अधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

गेल्या दीड महिन्यात जिल्हा परिषदेतून अनेक अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. तर काहीजणांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, महिला व बाल कल्याणचे मनोज ससे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी रणजित ओतारी यांची बदली झाली आहे. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बाल कल्याणच्या रोहिणी ढवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळकर यांनी नव्याने पदभार घेतलेला आहे.

...................................................

Web Title: 14 officers to be felicitated in Zilla Parishad