१२ जानेवारीला उदयसिंह कोयना बँकेत नव्हते

By Admin | Updated: July 30, 2014 23:39 IST2014-07-30T23:37:54+5:302014-07-30T23:39:49+5:30

फोन कॉल्सची माहिती न्यायालयात सादर

On 12th January, Uday Singh was not in the Koyna Bank | १२ जानेवारीला उदयसिंह कोयना बँकेत नव्हते

१२ जानेवारीला उदयसिंह कोयना बँकेत नव्हते


सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा खून होण्यापूर्वी म्हणजेच १२ जानेवारीला संबंधित अटकेत असलेल्या आरोपींसमवेत उदयसिंह पाटीलला पाहिले असल्याची साक्ष यापूर्वी संभाजी थोरात (रा. कार्वे, ता. कऱ्हाड) यांनी न्यायालयात दिली होती. मात्र, बुधवारी सुनावणीदरम्यान मोबाइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या दिवशीचे १२ जानेवारीचे मोबाइल लोकेशन न्यायालयात सादर केले. त्यामध्ये १२ जानेवारीला उदयसिंह पाटील साताऱ्यात असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा न्यायालयात आज (बुधवारी) सुनावणीदरम्यान आयडिया कंपनीचे विभागीय अधिकारी दत्ताराम आंगरे आणि एअरटेल कंपनीचे गणेश पवार यांची साक्ष झाली. त्यांनी न्यायालयात सीडीआर रिपोर्ट सादर केले. मोबाइल लोकेशनबाबत दोघांनी न्यायालयात सविस्तर माहिती दिली. मात्र, आजच्या सुनावणीदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. १२ जानेवारीला दुपारी साडेचार वाजता उदयसिंह पाटील, संभाजी पाटील, बाबा मोरे, सलीम शेख, सागर परमार या पाचजणांना कोयना बँकेतून खाली उतरताना मी पाहिले होते, अशी साक्ष संभाजी थोरात यांनी सरकार पक्षाच्या वतीने यापूर्वी दिली होती. परंतु आज न्यायालयात मोबाइल लोकेशचा अहवाल सादर केल्यानंतर १२ जानेवारीला उदयसिंह पाटील साताऱ्यात असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी दिली. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी ५ आॅगस्टला होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On 12th January, Uday Singh was not in the Koyna Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.