जिल्ह्यातील ५० हजार बाधितांत सातारा तालुक्यातील १२ हजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:18 PM2020-11-24T12:18:21+5:302020-11-24T12:23:13+5:30

coronavirus, hospital, health, Satara area, Mahabaleshwar Hill Station सातारा जिल्ह्यातील कोरोना संकटाला आता नऊ महिने होत आले असून आतापर्यंत जवळपास ५० हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १२ हजारांवर रुग्ण हे एकट्या सातारा तालुक्यात नोंदले आहेत. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. तर महाबळेश्वर आणि माण या तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी रुग्णसंख्या आहे.

12 thousand in Satara taluka out of 50 thousand affected in the district ... | जिल्ह्यातील ५० हजार बाधितांत सातारा तालुक्यातील १२ हजार...

जिल्ह्यातील ५० हजार बाधितांत सातारा तालुक्यातील १२ हजार...

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ५० हजार बाधितांत सातारा तालुक्यातील १२ हजार...मृत संख्याही अधिक : महाबळेश्वर, माणमध्ये कोरोना रुग्ण संख्या सर्वात कमी

सातारा : जिल्ह्यातील कोरोना संकटाला आता नऊ महिने होत आले असून आतापर्यंत जवळपास ५० हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १२ हजारांवर रुग्ण हे एकट्या सातारा तालुक्यात नोंदले आहेत. तसेच कोरोना बळींचा आकडाही साताऱ्यातच अधिक आहे. तर महाबळेश्वर आणि माण या तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी रुग्णसंख्या आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढला. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर दररोज कोरोनाचे रुग्ण ५०० ते ८००, ९०० दरम्यान वाढत होते.

एका दिवसात हजार रुग्ण नोंद झाल्याचेही दिसून आले. पण, आॅक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. कधी १००, २०० फारतर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. कधी-कधी तर ५० पर्यंत रुग्ण आढळले. पण, यामुळे बाधितांचा आकडा वाढतच गेला.

सध्यस्थितीत जिल्ह्यात ४९७३२ रुग्णसंख्या नोंद झाली आहे. यामधील १२ हजार १४६ कोरोना रुग्ण हे एकट्या सातारा तालुक्यात नोंद झालेले आहेत. तर यानंतर कºहाड तालुक्यात १० हजारांवर रुग्णांची नोंद झालेली आहे. इतर तालुक्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण बºयापैकी असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना बाधित आढळून येत आहेत तसेच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १६७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद ही सातारा तालुक्यातच झालेली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो. लवकरच कोरोना बाधितांचा आकडा ५० हजार पार होणार आहे. तसेच मृतांचा आकडाही सध्या १७०० जवळ पोहोचला आहे.


तालुकानिहाय कोरोना आकडेवारी

तालुका    बाधित           मृत

  • सातारा -  १२१४६           ४३५
  • कऱ्हाड - १०५५३            ३३१
  • कोरेगाव - ४५०४          १४८
  • फलटण - ४३१७           १३१
  • वाई - ३७९५                १३२
  • खटाव - ३४८५             १४६
  • जावळी - २७९३            ६४
  • खंडाळा - २४४६           ६९
  • पाटण - २०२६          ११२
  • माण - १९४०             ८३
  • महाबळेश्वर - ११२९   २०
  • इतर जिल्हे - ५९८       ...

Web Title: 12 thousand in Satara taluka out of 50 thousand affected in the district ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.