बिल्डरच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी १२ जणांवर गुन्हा

By Admin | Updated: October 31, 2014 00:49 IST2014-10-31T00:45:14+5:302014-10-31T00:49:17+5:30

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील ‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाची तोडफोड करून

12 people guilty of breaking the builder's office | बिल्डरच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी १२ जणांवर गुन्हा

बिल्डरच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी १२ जणांवर गुन्हा

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील ‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाची तोडफोड करून रखवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला.
‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे भागीदार महादेव माळी यांना दोन दिवसांपूर्वी मोबाईलवर फोन आला. ‘सैदापूरमधील तुझी साईट सुरू ठेवायची असेल, तर मला भेट, मी प्रतापसिंहनगरातील मनोजभाई बोलतोय,’ असे सांगून त्याने माळी यांना तंबी दिली. एवढ्यावरच न थांबता सायंकाळी १० ते १२ जणांनी तोंडाला रुमाल बांधून सैदापूर येथील ‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच यावेळी रखवालदार प्रकाश जाधव यांनाही मारहाण करण्यात आली. सुमारे १० ते १५ मिनिटांत हल्लेखोरांनी तोडफोड करून पलायन केले. या प्रकल्पामध्ये मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याचे निकटवर्तीयही आहेत. त्या हल्लेखोरांनी खाकीला सोडले नाही. रात्री उशिरा महादेव माळी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात १० ते १२ जणांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांवर तोडफोड, मारहाण आणि एक लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस हल्लेखोरांचा तपास करीत आहेत. माळी यांना ज्या मोबाईलवर फोन आला होता, त्या मोबाईल नंबरवरून संबंधित हल्लेखोरांचा शोध घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 12 people guilty of breaking the builder's office