शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Satara Crime: मलटण येथे १२ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 15:05 IST

२ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा एकूण १२ किलो २३० ग्रॅम गांजा

नसीर शिकलगारफलटण/ मलटण : फलटण शहर पोलिसांनी मलटण येथे केलेल्या कारवाईत दोन युवकांना गांजा विक्री करताना अटक केली असून, त्याच्या ताब्यातील २ लाख ४४ हजार रुपये किमतीचा एकूण १२ किलो २३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना कुंभारभट्टी, मलटण, फलटण येथील युवराज मोरे नावाचा युवक गांजाची विक्री करत असल्याची बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी एक पोलिस पथक तयार करून कारवाई करण्याची सूचना केली. पथकाने कुंभारभट्टी, मलटण येथील युवराज मोरे याच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्याठिकाणी युवराज बाळू मोरे (रा. कुंभारभट्टी, मलटण) व त्याच्याकडे कामास असलेला रामा राजेश जाधव (रा. मलटण, फलटण) असे मिळून आले. त्यांची झडती घेतली असता त्या दोघांचे ताब्यात २ लाख ४४ हजार ६००रुपये किमतीचा एकूण १२ किलो २३० ग्रॅम गांजा आढळून आला. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे, अमोल कदम, सचिन जगताप, दिग्विजय सांडगे, सुजित गावडे, सूरज परिहार, शरद तांबे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस