शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत वाईतील उद्योजकाला ११ कोटींचा गंडा, बॅंकेच्या चेअरमनसह १९ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 11:33 IST

सहा प्लॉटपैकी पाच प्लॉट मालक नसलेल्या कंपनीने इतरांना विकले

सातारा : तीन कोटींचे कर्ज असलेल्या जमिनीच्या लिलाव प्रक्रियेत वाईतील उद्योजकाला सहभागी करून त्याची ११ कोटी ३ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात साहेबराव देशमुख काॅ-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन आणि विद्यमान चेअरमन तसेच मूळ शेतकरी विजय शिंदे यांच्यासह १९ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशमुख, विद्यमान चेअरमन बिपीन कुरतडकर, वसुली अधिकारी खामकर, जनरल मॅनेजर अनिल कदम, साकीनाका शाखेचे मॅनेजर हणमंत बोडके, विठ्ठल चिकणे, अरविंद धनवडे, साधना जाधव, सुनीता जुनघरे, बिना मेहता, विशाल शहा, विजय शिंदे, राजेश्वर कासार अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय चंद्रकांत मोरे (वय ६३, रा. माेतीबाग, वाई, जि.सातारा) हे उद्योजक आहेत. त्यांची औरंगाबाद येथे मोरे स्पोर्ट्स इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. तसेच वाई येथेही साई पर्न शिट नावाची कंपनी आहे. विजय शिंदे यांच्या मालकीची खिंडवाडी ( सातारा ) येथे १०.५ एकर एन. ए. जागा आहे. यावर साहेबराव को ऑपरेटिव्ह बँकेचे ३ कोटींचे कर्ज होते. हे कर्ज थकीत असल्याने बँकेचे अधिकारी उद्योजक संजय मोरे यांच्याकडे औरंगाबाद येथे गेले. त्यांनी ही जागा विकत घेण्यासाठी लिलाव प्रक्रियेत मोरेंना सहभागी होण्यास सांगितले. त्यानुसार ते सहभागी झाले.मूळ मालक विजय शिंदे याने त्या जमिनीवर ७५ प्लॉट केले होते. त्यापैकी ६ प्लॉट विकण्याची परवानगी बँकेने परस्पर दिली. सहा प्लॉटपैकी पाच प्लॉट मालक नसलेल्या कंपनीने इतरांना विकले. यामध्ये साहेबराव देशमुख को - ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. या सर्वांनी मे. क्रिस्टल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशी कंपनी स्थापन केली होती. प्लॉटच्या विक्रीनंतर या कंपनीची सातबारावरील नोंद तलाठ्यांना अर्ज देऊन रद्द केली आहे.

हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मूळ शेती मालक विजय शिंदे आणि बँकेने आपली फसगत केल्याचे मोरे यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी आपली ११ कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लिलावासाठी असे उभे केले पैसेसंजय मोरे यांनी विविध बँकांचे कर्जे काढून लिलावाचे ८ कोटी ३ लाख ६२ हजार रुपये भरले. तसेच इतर व्यवहारासाठी औरंगाबाद येथील तापडीया टेरेस अदालत रोड येथील मोरे यांचे मित्र दिनेश दरक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या पाच दुकान गाळ्यांवर प्रत्येकी ४० लाखांचे कर्ज काढून २ कोटी रुपये उभे केले. नोंदणीसाठी १ कोटी रुपयांचा खर्च आला. असे एकूण ११ कोटी या व्यवहारापोटी त्यांनी खर्च केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी