सातारा : माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे. सातारा जिल्ह्याचा निकाल ९६.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्याचा गेल्या वर्षी निकाल ९७.१९ टक्के होता, तो यंदा ०.४४ टक्क्याने घसरला आहे. जिल्ह्यातील ७३९ शाळांतून ११६ परीक्षा केंद्रांवरून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी ३७ हजार २०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३५ हजार ९९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.साताऱ्यात १७ हजार ९४२ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी १७ हजार ५९८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलीच गुणवत्तेत अव्वल ठरल्या असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०८ टक्के आहे. मुलांमध्ये १९ हजार २६१ मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी ९५.५२ टक्के म्हणजेच १८ हजार ३९९ मुले उत्तीर्ण झाली. रिपीटर बसलेल्या ५५० विद्यार्थ्यांपैकी २२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ४०.१८ टक्के लागला आहे.
सातारा जिल्ह्यात दहावीचा टक्का घसरला, ९६.७५ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:33 IST