शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेचे पाणी, १०५० क्युसेक विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:08 IST

कोयनेवर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून...

सातारा : सातारा जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाले असून, कोयना धरणही भरले आहे. त्यामुळे वर्षभराचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे. तर आता सांगली जिल्हा पाटबंधारे मंडळाने सिंचनाची मागणी केली आहे. या मागणीनुसार सोमवारी सकाळपासून कोयनेतून १ हजार ५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे दरवर्षी कोयना धरण भरते की नाही याकडे साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असते. यावर्षी जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले आहे. परिणामी, मोठे तसेच मध्यम प्रकल्पही भरून वाहिले. मागील सप्टेंबर महिन्यातच कोयना धरणही पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. आता धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होणार आहे. तर उन्हाळ्याच्या काळात अधिक मागणी राहते. त्यामुळे मागणीनुसार पाणी सोडावे लागते.सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झाली आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पायथा वीज गृहाचे एक युनिट सुरू केले आहे. या युनिटमधून १ हजार ५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे. या विसर्गाने कोयना नदीच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तर भविष्यात आणखी मागणी झाल्यास कोयना धरणातून जादा पाणी सोडले जाणार आहे. सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग केला जातो.कोयनेवर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून...कोयना धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. तसेच सांगलीमधीलच ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन पाणी योजनाही कोयना धरणावरच अवलंबून आहेत. यामुळे कोयना धरण दरवर्षी भरले की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Koyna Water Released for Sangli Irrigation, 1050 Cusecs Discharged

Web Summary : Koyna Dam releases 1050 cusecs of water for Sangli's irrigation following a request from the irrigation department. The release from Koyna, which is full due to good rainfall, benefits Sangli and Solapur districts, supporting key irrigation projects like Tembhu, Takari, and Mhaisal.