साताऱ्यातील १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 20:41 IST2018-06-08T20:41:37+5:302018-06-08T20:41:37+5:30

साताऱ्यातील १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द
सातारा : एसटी कर्मचाºयांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचा सातारा जिल्तील हजारो प्रवाशांना फटका बसला. एकूण १ हजार ६१४ एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी पोलिसांनी काही एसटी बसेस बंदोबस्तात मार्गस्थ केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.
राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याने सातारा जिल्'तील सर्व एसटी कर्मचाºयांनी या बंदमध्ये भाग घेतला. बंदमुळे जिल्तील शेकडो एसटींची चाके थांबली. पहाटेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत एसटीच्या १ हजार ६७४ फेºया होतात. परंतु बंदमुळे १ हजार ६१४ फेºया रद्द कराव्या लागल्या. कऱ्हाड, दहिवडी, वडूज, फलटण, पाटण, खंडाळा, वडूज, कोरेगाव या आगारांत तुरळक वाहतूक सुरू होती. जिल्'तील डेपोतून बाहेर गेलेल्या गाड्या सकाळी अकरापर्यंत माघारी येऊन त्याही संपात सहभागी झाल्या.
एसटीबरोबरच शहर बसदेखील बंद असल्याने वडाप वाहतुकीचा दर देखील वाढला होता. शिवशाही व कर्नाटकातील एसटी चालू असल्याने या गाड्यांना मोठी गर्दी होती. बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच बरोबर होमगार्डचे फिरते पथक देखील बंदोबस्तात सामील झाले होते.