शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा नोंदीसाठी मागितले १ लाख, साताऱ्यात लाच घेताना मंडलाधिकारी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:13 IST

लाच घेताना रंगेहाथ पकडले

सातारा : शेतजमिनीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी ७५ हजारांची लाच घेताना खिंडवाडी, ता. सातारा येथील मंडलाधिकारी अजित दादासाहेब घाडगे (वय ४८, रा. कृष्णानगर, वनवासवाडी, सातारा) याला लाचलुचपत विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.यातील तक्रारदाराने खिंडवाडी, ता. सातारा येथील शेतजमिनीचे कुळ मुखत्यारपत्र घेतले आहे. तक्रारदाराने मंडालाधिकारी घाडगे यांच्याकडे दस्त नोंदणीसाठी आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपावरून फेरफार रद्द करण्यासाठी तसेच सातबारावरील ४७ गुठ्यांची नोंद तुमच्या बाजूने करून देण्यासाठी मंडलाधिकारी घाडगे याने १ लाखाची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. सुरुवातीला ७५ हजार व सातबाऱ्यावर नाव आल्यास उर्वरित २५ हजार रुपये त्याने मागितले. या प्रकारानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागात जाऊन रीतसर लेखी तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता मंडलाधिकारी घाडगे हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाने मंडलाधिकारी कार्यालयात सापळा लावला. यावेळी घाडगे याला ७५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गोगावले, गणेश ताटे, नीलेश राजपुरे यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग