शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:16 IST

नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट

सांगली : जिल्हा परिषद ६८ आणि पंचायत समिती १३६ मतदारसंघाची पुनर्रचना महसूल विभागाकडून जवळपास पूर्ण झाली आहे. या मतदारसंघ पुनर्रचनेत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांच्या मतदारसंघाची तोडफोड केल्याचा इच्छुकांकडून आरोप होत आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा कधी प्रसिद्ध होणार? आणि मतदारसंघ कसा असेल? याची उत्सुक्ताही इच्छुकांना लागली आहे. नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांचा कच्चा आराखडा तयार करून तो ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या मुदतीत गट व गणांचा कच्चा आराखडा तयार केला; परंतु तो प्रसिद्ध केला नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना मतदारसंघ कसा असेल, याची उत्सुकता शिगेला लागली आहे. याबरोबरच महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदारसंघ आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीचे केले आहेत, असा काही जिल्हा परिषद सदस्यांकडून आरोप होत आहे. काही सदस्यांना आपल्या मतदारसंघाचे खूपच खूपच तोडफोड केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोहोचली आहे. यामुळे ते सदस्य खूपच चिंतित आहेत.निवडणुका मे महिन्यातजिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची मुदत २१ मार्च २०२२ रोजी, तर दहा पंचायत समित्यांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ ला संपत आहे. कमाल १२ जानेवारी २०२२ पर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे आवश्यक होते. परंतु, अद्याप गट, गणरचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नियोजित मुदतीत निवडणूक होणार नाही हे निश्चित झाले आहे. 

राज्य निवडणूक आयोगानेही दोन महिने निवडणुका पुढे जाणार असे जाहीर केले आहे. या सर्वांचा विचार केल्यास मे महिन्यांनंतरच निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण झाली असेल तर प्रशासनाने प्रारूप आराखडा जनतेसाठी खुला करावा. गुपचूप मतदारसंघाची तोडफोड करून जनतेला अंधारात ठेवले तर आम्ही न्यायालयात जाणार आहे. भौगोलिक विचार करूनच मतदारसंघाची पुनर्रचना झाली पाहिजे. यामध्ये काही गोलमाल केले तर न्यायालयात आम्ही धाव घेणार आहे.  -जितेंद्र पाटील, जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद, काँग्रेस

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती