शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये - देवेंद्र फडणवीस 

By अशोक डोंबाळे | Updated: May 23, 2025 18:28 IST

सांगलीत भाजपचा मेळावा, जिल्हा परिषदेनंतर महापालिका निवडणुकांचे संकेत

अशोक डोंबाळेसांगली : भाजप पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सज्ज रहावे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये प्रथम जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि त्यांच्यासोबतच नगरपालिका निवडणुका होतील. त्यानंतर १५ दिवसांत लगेच महापालिका निवडणुका होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सांगलीत शुक्रवारी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजीत देशमुख, गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवान साळुंखे, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, दीपक शिंदे, नीता केळकर आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार झाली होती. या निवडणुकीतील दोष शोधून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरी करून महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका होतील. त्यानंतर १५ दिवसांत महापालिका निवडणुका होणार आहेत. कमी कालावधी असून कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्यानंतर निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मी पुन्हा येईन..'मी पुन्हा येईन' तेव्हा कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करेन. मला पुन्हा येण्याची सवय आहे. त्यामुळे मी नक्की पुन्हा सांगलीला येईन त्यावेळी कार्यकर्त्यांना भरपूर वेळ देईन, असे फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला. कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यास दाद दिली.

दादांनी ‘तंत्र’ वापरलेफडणवीस म्हणाले, दिल्लीतील बैठकीस मला जायचे होते. यामुळे चंद्रकांत पाटील यांना भाजप मेळाव्यातून तात्काळ मुक्त करण्याची विनंती केली. चंद्रकांत पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पदाचे योग्य कौशल्य वापरून मला वेळेत मुक्त केले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. फडणवीस यांच्या या वाक्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

टॅग्स :SangliसांगलीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElectionनिवडणूक 2024zpजिल्हा परिषदMuncipal Corporationनगर पालिका