शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गाळातून सोने शोधणारा झारी सोनार उपेक्षित; शिराळ्यात सराफांच्या दारातील नाल्यात घेतायत सोन्याचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:28 IST

वस्तू शोधल्यास बक्षिसी

विकास शहाशिराळा : एक उपेक्षित व्यवसाय आणि व्यावसायिक म्हणजे ‘झारी सोनार’ गावोगावी भटकत नाले, सांडपाण्यातून सोन्या-चांदीच्या वस्तू शोधून आपला उदरनिर्वाह करणारे नागरिक! दिवसभर या सांडपाण्यात राहून त्यांची भटकंती सुरू असते. काही मिळाले तर ठीक नाहीतर परत दुसऱ्या दिवशी, त्याच उत्साहाने कामाला सुरू.निपाणी (कर्नाटक) येथील एक कुटुंब शिराळा येथे आले असून, गावातील प्रत्येक सराफ दुकानदारांच्या दाराजवळील नाल्यात उतरून सोने-चांदी आदी वस्तूंचा शोध ते घेत आहेत.नागेंद्र हरिजन व त्यांच्या पत्नी मीना हरिजन, आई यल्लमा शेट्टी, दोन वर्षांची अक्षदा, नागेंद्र यांचे मेहुणे आनंद शेट्टी हे शिराळ्यात आले आहेत. हा व्यवसाय करणारी ही त्यांची तिसरी पिढी आहे.दिवाळीनंतर त्यांची भटकंती सुरू होते. दिवाळीत सराफ, तसेच नागरिक घरांची झाडलोट करतात व हा कचरा नाल्यात टाकला जातो. पावसाळ्यामुळे गटारीतील जादाचा अनावश्यक कचरा वाहून गेलेला असतो. या कुटुंबातील एक व्यक्ती नाल्यातील पाण्यात उतरून वाळूमिश्रित गाळ पाटीमध्ये घेतात. या गाळात खरे, खोटे दागिने अथवा सोन्या-चांदीचे तुकडे आढळून येतात. यातील आवश्यक गोष्टी त्या आपल्याबरोबर घेतात.

वस्तू शोधल्यास बक्षिसीआमचा हा व्यवसाय करणारी तिसरी पिढी आहे. काहीवेळा सराफ आम्हाला एखादा दागिना हरवला आहे तो मिळतो का पाहा, असे सांगतात. त्यादृष्टीने आम्ही गाळ तपासतो व अशा वस्तू मिळाल्यास आम्हाला हे सराफ बक्षीस देतात. बांबवडे येथे गंठन शोधण्यास सांगितले. ही वस्तू हुडकून दिल्यावर संबंधित सराफ यांनी एक हजार रुपये बक्षीस दिले होते. माझ्या तीन मुली आश्रमशाळेत शिकत असून चौथी दोन वर्षांच्या अक्षदा हिला बरोबर घेऊन फिरत आहे. - नागेंद्र हरिजन, झारी सराफ व्यावसायिक, निपाणी

टॅग्स :SangliसांगलीGoldसोनं