शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

लुटमार करणारी टोळी सांगलीत जेरबंद -चौघांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 14:20 IST

येथील गोकूळनगरजवळ आर. किरणराव प्रसाद (वय २९, रा. आंध्रप्रदेश) या ट्रक चालकास मारहाण करुन तीन हजाराची रोकड लुटणाºया चौघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले.

ठळक मुद्देगोकूळनगरजवळ ट्रक चालक लुटीचा गुन्हा उघडकीसपोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी ट्रक चालकास लुटल्याची कबूली दिली.

सांगली : येथील गोकूळनगरजवळ आर. किरणराव प्रसाद (वय २९, रा. आंध्रप्रदेश) या ट्रक चालकास मारहाण करुन तीन हजाराची रोकड लुटणाºया चौघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. रविवारी रात्री लुटमारीची ही घटना घडली होती. 

अटक केलेल्यांमध्ये गणेश दादासाहेब पांढरे (वय २०, रामकृष्णनगर, कुपवाड), संतोष शिवाजी तंगडी (३२), रोनीत रमेश पुजारी (२२, दोघे रा. टिंबर एरिया, गुरुद्वारसमोर, सांगली), सुजित दादासाहेब चंदनशिवे (२३, रा. अग्नीशमन विभाग, कार्यालयासमोर, नवीन वसाहत, सांगली) यांचा समावेश आहे. 

आर. प्रसाद हे कडाप्पा येथील एस. व्यंकटेश वसलू यांच्या ट्रकवर (क्र. एपी ०४ टीडब्ल्यू ८९८९) चालक म्हणून काम करतात. ते फौंड्रीसाठी लागणारी वाळू ट्रकमधून घेऊन सांगलीत आद्योगिक वसाहतमध्ये आले होते. वाळू खाली करुन गोकूळनगरजवळील रोहित रोडवेजवळ त्यांनी ट्रक उभा केला. रात्री ते ट्रकमध्ये स्वयंपाक करीत होते. त्यावेळी संशयित दुचाकीवरुन आले. त्यांनी आर. प्रसाद यांच्याकडे पन्नास रुपये मागितले. प्रसाद यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संशयितांनी त्यांना दगडाने मारहाण करुन त्यांच्या खिशातील तीन हजाराची रोकड घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. परिसरात त्यांनी चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासणीचे कामही सुरु होते. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, हवालदार युवराज पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, विकास भोसले यांचे पथक संजयनगर पोलीस ठाण्याच्याहद्दीत गस्त घालत होते. चौघेही संशयित दोन दुचाकीवरुन फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पण ते उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी ट्रक चालकास लुटल्याची कबूली दिली.

 गंभीर गुन्हेटोळीतील तंगडी, पुजारी व चंदनशिवे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध बोगस धनादेश, चोरी, मारामारीचे गुन्हे नोंद आहेत. ट्रक चालक लुटीच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून लुटमारीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी