शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

Sangli: खंडेराजुरीत लग्नाच्या वरातीत तरुणाचा चाकूने भोसकून खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:17 IST

लष्कर भरतीची परीक्षाही उत्तीर्ण झाला. काही दिवसात वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता. तोच..

मिरज : खंडेराजुरी ता. मिरज येथे रविवारी रात्री लग्नाच्या वरातीत सुमित जयंत कांबळे (वय २१) या तरुणाचा सुरज सचिन आठवले व साथीदारानी चाकूने भोसकून खून केला. रंगपंचमीदिवशी रंग लावण्याच्या वादातून व पूर्व वैमनस्यातून सुरज आठवले व साथीदारानी सुमित कांबळे यास लग्नाच्या वरातीत नाचताना पोटात व छातीवर चाकूचे सपासप वार करून ठार मारले. सुरज आठवले हा गुन्हेगारी वृत्तीचा असून यापूर्वी त्याने गणेशोत्सवात खंडेराजुरीत एका तरुणावर चाकूहल्ला केला होता. खिद्रापूर येथील आठवले याचे खंडेराजुरी आजोळ असून गावात त्याने दहशत निर्माण केली होती. गावातील सुमित कांबळे याच्याशी रंगपंचमीला रंग लावण्याच्या वादातून सूरजचा वाद झाला होता. या वादातून सूरजने सुमित यास बघून घेण्याची धमकी दिली होती.रविवारी रात्री गावात सुमित धनसरे यांच्या लग्नाच्या वरातीत सुमित कांबळे हा डीजेवर नाचत होता. यावेळी सूरज व त्याच्या साथीदारांनी रंग पंचमीला झालेल्या वादाचा जाब विचारत सुमित यास घेरले. सूरज याने सुमित यांच्या छातीवर पोटावर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सुमित तेथेच खाली पडला. डीजेच्या आवाजात सुमित याच्यावर चाकूहल्ला झाल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. थोड्या वेळाने सुमित गर्दीत खाली पडल्याचे दिसल्यानंतर वरातीत धावपळ उडाली. यावेळी सूरज व साथीदार तेथेच नाचत होते. सूरज याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सुरज आठवले याच्यासह अतुल वायदंडे, शरद ढोबळे, आकाश कांबळे या साथीदारांना ताब्यात घेतले. अन्य दोघेजण फरार झाले. 

मृत सुमित कांबळे हा लष्करात भरतीची तयारी करत होता. भरतीची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. काही दिवसात तो वैद्यकीय तपासणीसाठी जाणार होता. सुमित यांच्या खुनामुळे गावात खळबळ उडाली. सुरज आठवले याच्याविरुद्ध यापूर्वी खुनी हल्ला , चोऱ्या, दादागिरी असे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात सुरज आठवले व त्याच्या साथीदाराविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस