युवकांनी व्यसनांना झुगारून विवेकी बनावे
By Admin | Updated: January 1, 2015 00:10 IST2014-12-31T22:55:47+5:302015-01-01T00:10:53+5:30
विश्वास सायनाकर : ‘अंनिस’चा कार्यक्रम

युवकांनी व्यसनांना झुगारून विवेकी बनावे
इस्लामपूर : व्यसनांना झुगारून सशक्त, विवेकी समाज निर्मितीसाठी युवकांनी प्रयत्नशील राहावे. व्यसनांना बदनाम करावे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी केले.
येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आयोजित व्यसनविरोधी निर्धार सभेत ते बोलत होते. प्राचार्य विश्वास सायनाकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य आर. डी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
आर. डी. सावंत यांनी व्यसनांबाबतीत संयमाने राहण्याचा, व्यसनांना विरोध व आरोग्याकडे लक्ष देण्याचा मोलाचा सल्ला युवा पिढीला दिला. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, प्राचार्य डॉ. बी. एस. काळे, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील, प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, डॉ. राहुल मोरे, डॉ. सुधीर बनसोडे, आनंदा कांबळे, प्रा. एल. डी. पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनविरोधी निर्धाराची शपथ देण्यात आली. पोस्टर प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य सायनाकर यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.
‘अंनिस’चे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, डॉ. प्रमोद गंगणमाले, प्रा. विष्णू होनमोरे, प्रा. पी. एस. पाटील, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. एस. के. माने, प्रा. विजय तिबीले, विजय नांगरे, अजय भालकर, धीरज भोसले, ऐश्वर्या पाटील, सुयश तोष्णीवाल यांनी संयोजन केले. (वार्ताहर)