जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिताताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नाईक म्हणाले, तालुक्यातील संघटन बांधणीसाठी मी स्वतः तुमच्यासोबत कार्यरत राहणार आहे. त्यासाठी कोणतीही अडचण असल्यास प्रत्येक कार्यकर्त्यासोबत मी असणार आहे.
सुश्मिता जाधव म्हणाल्या, महिलांना बळ देणे ही आपल्या पुरुष पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तळागाळातील महिलांशी स्वतः संपर्क साधणार आहे. आपल्याला साथीची गरज आहे. पक्षाला साथ दिल्यास आपण नक्कीच एक चांगलं संघटन उभारू शकतो.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, सरचिटणीस अलका माने, युवती जिल्हाध्यक्षा पूजा लाड, अमोल डफळे, जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, जयंत भोसले, सरचिटणीस सचिन होर्तीकर, अशोक कोळी, मच्छिंद्र वाघमोडे, तालुका महिलाध्यक्ष मीनाक्षीताई अक्की, श्रद्धा शिंदे, सिद्धू शिरशाड उपस्थित होते.