सांगली : जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ महापालिकेच्या मुव्हेबल गाळ्याजवळील नशेखोरांच्या अड्ड्यावर सौरभ महादेव पवार (वय २२, रा. राजीवनगर, कुपवाड रस्ता, सांगली) या तरुणाचा सोमवारी दोघांनी निर्घृण खून केला होता. याप्रकरणी शाहिद समीर मुल्ला (२२) याला पोलिसांनी अटक केली.पूर्वी सिगारेट ओढण्याच्या कारणावरून मयत व संशयित शाहिद याच्यात वाद झाला होता. याचा राग मनात धरून सौरभचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. शाहिद याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.दरम्यान, या खुनातील दुसरा संशयित आयान समीर भिस्ती (२४, रा. राजीवनगर) हा घटनेनंतर पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे निरीक्षक सतीश कदम यांनी सांगितले. याबाबत माहिती अशी की, मृत सौरभ हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.तर संशयित शाहिद मुल्ला व आयान भिस्ती हेदेखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तिघेही नशा करत होते. कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरवरील महापालिकेच्या गाळ्यामागे नशेखोरांच्या अड्ड्यांवर ते भेटत असत. काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित यांच्यात सिगारेट ओढण्याचा कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात संशयितांना होता.सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मृत सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार पाथरवट हे दोघेजण दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आले. तेव्हा संशयित दोघेजण दुचाकीजवळ आले. त्यांनी सौरभवर धारदार शस्त्राने थेट वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ सावध होऊन दुचाकी टाकून पळाला. दोघांनी त्याचा पाठलाग करून खून केला. खुनानंतर दोघेही संशयित पळून जात होते. यावेळी पोलिस हेड काॅन्स्टेबल प्रदीप भोसले यांनी शाहिद याला पाठलाग करून पकडले. तर दुसरा संशयित आयान हा पसार झाला होता.
Web Summary : A Sangli youth, Saurabh Pawar, was murdered over a cigarette dispute. One suspect, Shahid Mulla, is arrested and remanded to four-day police custody. Another suspect, Aayan Bhisti, is absconding. Both suspects have criminal records.
Web Summary : सांगली में सिगरेट को लेकर विवाद में सौरभ पवार नामक युवक की हत्या कर दी गई। एक संदिग्ध, शाहिद मुल्ला, गिरफ्तार, चार दिन की पुलिस हिरासत में। दूसरा संदिग्ध, आयान भिस्ती, फरार। दोनों का आपराधिक रिकॉर्ड है।