शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: उलथापालथ राजकारणात, आबांचा पट्ट्या गावागावात; बिकट वाट तरीही आव्हान स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:23 IST

रोहित पाटलांची कर्तव्य यात्रा : गावोगावी तळ ठोकून नागरिकांशी संवाद

दत्ता पाटील तासगाव : शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्यानंतर पक्ष गेला. पक्षाचे चिन्ह गेले. मात्र, या परिस्थितीत देखील आबांचा पट्ट्या ‘कर्तव्य यात्रा’ घेऊन तासगाव, कवठेमंकाळ तालुक्यातील गावागावात लोकांत जात आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते रोहित पाटील कर्तव्य यात्रा घेऊन मतदार संघ पिंजून काढत आहेत. लोकांच्या समस्या जाणून, त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करून, गावातच तळ ठोकून बालेकिल्ला भक्कम करण्याचा प्रयत्न रोहित पाटील यांच्याकडून होत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादीत फूट पडली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे कुटुंबीय आर. आर. पाटील यांच्या विचारांचा वारसा जोपासत, शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहिले. गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेले. काँग्रेसमध्ये खिंडार पडले. महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होत आहे. मात्र, राज्यात होणाऱ्या या उलथापालथीने विचलित न होता, रोहित पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्याप्रमाणेच जनतेत जाऊन काम करायला सुरुवात केली आहे.दहा दिवसांपूर्वी तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात कर्तव्य यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या माध्यमातून रोज चार गावांचा दौरा करून शेवटच्या गावात मुक्काम करायचा. प्रत्येक गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत, या समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करताना रोहित पाटील दिसून येत आहेत.

कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी राज्यातील राजकारणाकडे दुर्लक्ष करून, मतदार संघावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. या यात्रेनिमित्त ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचून, बालेकिल्ला भक्कम करण्यासाठी रोहित पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

बिकट वाट तरीही आव्हान स्वीकारले राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आबा कुटुंबीय गेले असते, तर सत्तेत राहता आले असते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून खासदारांचा विरोध संपुष्टात आला असता. मात्र, शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे राजकीय वाटचाल बिकट झाली आहे, तरीही हे आव्हान स्वीकारूनच रोहित पाटील यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणRohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेस