शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पोहायला गेला, मगरीच्या हल्ल्यात अंकलखोप येथील युवक ठार झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:26 IST

अंकलखोप : मगरीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी अंकलखोप (ता. पलूस) येथे घडली आहे. भिलवडी पोलिस व वनविभागाच्या ...

अंकलखोप : मगरीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी अंकलखोप (ता. पलूस) येथे घडली आहे. भिलवडी पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात बोटीतून शोध घेत असताना बुधवारी ( दि. २) भिलवडी येथील हाळभाग येथे युवकाचा मृतदेह आढळून आला. अजित अनिल गायकवाड (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे.अजित गायकवाड हा मंगळवारी (दि.१) रोजी कृष्णा नदीवर दुपारी १ वाजता पोहण्यासाठी गेला होता. दुपारी घरी न आल्यामुळे घरातील लोकांनी गावात त्याचा शोधा घेतला. बुधवारी सकाळी गावातील लोक नदीवर पोहण्यासाठी गेले असता त्यांना नदी काठावर अजितचे कपडे व चप्पल आढळून आली. नागरिकांनी अजितच्या घरच्यांना माहिती दिली व त्यानंतर संबंधित कपडे व चप्पल अजितचे असल्याचे घरच्यांनी ओळखले.अजितचा चुलत भाऊ अविनाश बाळासो गायकवाड यांनी अजित हरविला असल्याची तक्रार बुधवारी सकाळी भिलवडी पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर भिलवडी पोलिस व वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ यांनी नितीन गुरव यांच्या मदतीने नदी पात्रात बोटीतून शोधा शोध सुरू केली. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास भिलवडी येथील हाळभाग येथे अजितचा मृतदेह झुडपात तरंगताना आढळला.अजित गायकवाड हा औदुंबर येथील दत्त देवस्थान समितीचा कर्मचारी होता. वन क्षेत्रपाल संतोष शिरसाटवार, वनपाल सुजित गवते, वनपाल सुरेखा लोहार, सहायक पोलिस निरीक्षक के. बी. हारुगडे व पोलिस हवालदार सुनील सूर्यवंशी, स्वप्नील शिंदेंसह ४ होमगार्ड यांनी शोध कामात मदत केली.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू