काेल्हापुरातील युवकाची पुनवतमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:40+5:302021-04-27T04:28:40+5:30

: पुनवत (ता. शिराळा) येथे आजीकडे सुटीसाठी आलेल्या सिद्धेश सागर यादव (१८, रा. कोल्हापूर) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या ...

Youth commits suicide in Pune | काेल्हापुरातील युवकाची पुनवतमध्ये आत्महत्या

काेल्हापुरातील युवकाची पुनवतमध्ये आत्महत्या

: पुनवत (ता. शिराळा) येथे आजीकडे सुटीसाठी आलेल्या सिद्धेश सागर यादव (१८, रा. कोल्हापूर) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २६ रोजी दुपारी १ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

काेल्हापूर येथील सिद्धेश यादव हा सुटीसाठी पुनवत येथील आजी पार्वती महादेव परीट यांच्याकडे राहण्यास आला होता. साेमवारी सकाळी तो आजीबरोबर शेतात पिकाला देण्यासाठी गेला. यानंतर आजीला ‘मी घरी जाऊन आंघोळ करतो,’ असे सांगून ताे घरी आला. यानंतर दुपारी दीडच्या दरम्यान पार्वती परीट या शेतातून घरी आल्या असता सिद्धेशने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. याबाबत पार्वती परीट यांनी शिराळा पाेलीस ठाण्यात वर्दी दिली असून, तपास हवालदार आर. एस. कानडे करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide in Pune