खासगी सावकारीतून घाटनांद्रेत युवकाची गळफासाने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST2021-06-21T04:19:06+5:302021-06-21T04:19:06+5:30

कवठेमहांकाळ : खासगी सावकाराकडून होणारा मानसिक छळ आणि प्रेम प्रकरणातून घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

Youth commits suicide by hanging from private lender | खासगी सावकारीतून घाटनांद्रेत युवकाची गळफासाने आत्महत्या

खासगी सावकारीतून घाटनांद्रेत युवकाची गळफासाने आत्महत्या

कवठेमहांकाळ : खासगी सावकाराकडून होणारा मानसिक छळ आणि प्रेम प्रकरणातून घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश सूर्याजी शिंदे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. घटनेची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस कारवाईच्या भीतीने खासगी सावकार प्रवीण बाळासाहेब शिंदे हा फरार झाला आहे.

मृत योगेश याने खासगी सावकार प्रवीण शिंदे याच्याकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. हे पैसे योगेशने मित्र सचिन बबन शिंदे याला दिले होते. कर्ज व व्याजाची रक्कम परत न केल्याने सावकार प्रवीण शिंदे याने योगेशला वारंवार धमकी देऊन त्याची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यामुळे योगेश मानसिक तणावाखाली होता. या सर्व कारणांमुळे व प्रेम प्रकरणामुळे मी जीवनयात्रा संपवत आहे, असे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवून याेगेशने रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती घाटनांद्रेचे नागरिक रामराव विठ्ठल शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. कवठेमहांकाळ पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चाैकट

याेगेश मानसिक तणावाखाली

योगेश आणि सचिन बबन शिंदे, तसेच खासगी सावकार प्रवीण बाळासाहेब शिंदे हे तिघेही मित्र होते. प्रवीण शिंदे याने कर्ज म्हणून योगेशला पैसे दिले. याेगेश रक्कम फेडू न शकल्याने त्याने जमीन नावावर करून घेतली. त्यामुळे योगेश गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता, असे काही गावकऱ्यांनी सांगितले.

चौकट

गळफास घेण्याच्या आधी योगेश याने ‘मी आत्महत्या करत आहे. कारण की खासगी सावकाराकडून कर्ज काढून, मी माझा मित्र सचिन बबन शिंदे यांना पैसे दिलेले आहेत; पण कर्ज न भरल्याने माझी जमीन प्रवीण बाळासाहेब शिंदे यांनी मला धमकी देऊन काढून नावे करून घेतली आहे आणि प्रेम प्रकरणातून मी आत्महत्या करत आहे. नाव याेगेश सूर्याजी शिंदे,’ असे स्टेटस ठेवले आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात या घटनेची आत्महत्या म्हणून नोंद आहे. या प्रकरणात अनेकजण गुंतल्याची चर्चा गावात सुरू आहे.

Web Title: Youth commits suicide by hanging from private lender