जनतेच्या मनातील ‘आपला माणूस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:09+5:302021-06-26T04:19:09+5:30
सहकारातून समृद्धी, उद्योगातून रोजगारनिर्मिती, शेतीची सर्वांगीण प्रगती, प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराने वेळेची बचत, उत्पादन व दर्जात वाढ, शैक्षणिक व सामाजिक ...

जनतेच्या मनातील ‘आपला माणूस’
सहकारातून समृद्धी, उद्योगातून रोजगारनिर्मिती, शेतीची सर्वांगीण प्रगती, प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराने वेळेची बचत, उत्पादन व दर्जात वाढ, शैक्षणिक व सामाजिक विकास हा मूलमंत्र घेऊन मानसिंगभाऊंची अत्यंत प्रभावीपणे वाटचाल सुरू आहे. संयमी नेतृत्व, दूरदृष्टी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे यशस्वी उद्योजक, समाजकारणी, राजकारणी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख दृढ झाली आहे. मानसिंगभाऊंनी त्यांच्या एकूणच राजकीय वाटचालीत अनेक चढ-उतार जवळून पाहिले, अनुभवले व त्यावर मात करण्याचे धैर्यही दाखविले आहे.
२००० पासून सहकाराबरोबर समाजकारण आणि राजकारणात पदार्पण केलेल्या भाऊंनी अल्पावधीता आमूलाग्र बदल घडविले आहेत. सहकाराचा व त्याला पूरक उद्योगांचा अभ्यास करून काळाच्या पावलांबरोबर बदल केले. नवीन प्रकल्पांची, संस्थांची यशस्विपणे उभारणी केली. आज विस्तारलेला ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समूहाचा परिघ देशातून परदेशापर्यंत मजल मारण्याच्या तयारीत आहे. विविधांगी क्षेत्रांची व सर्वसामान्य जनतेची प्रगती हाच एकमेव मूलमंत्र घेऊन काम करणाऱ्या मानसिंगभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:चा वेगळा ठसा निर्माण केला आहे. विश्वास कारखान्यास मिळालेले आयएसओ व फूड सेफ्टी आयएसओ मानांकन हे भाऊंच्या, संचालकांच्या, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक आहे. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाची त्याला जोड आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून त्यांनी मोठा निधी खेचून आणला. पूल, रस्ते, साकव, सभा मंडप, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह, काँक्रिट रस्ते, नाले, पाणंद रस्ते, पिण्याच्या पाणी योजना, कूपनलिका, पाईपलाईन, ग्रामपंचायत कार्यालय इमारती, ग्रामसचिवालय इमारती, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, नुकतीच पूर्ण झालेली शिराळ्यातील टोलेजंग मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पूर्णत्वाकडे गेलेली पंचायत समिती इमारत, सर्वसोयींनीयुक्त आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अत्यंत देखणी शिराळ्यातील बसस्थानक इमारत, उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेली शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, बिळाशी, येळापूर, पाचगणी व चिकुर्डे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी, पाचगणी, खराळे, चिंचेवाडी व जक्राईवाडी येथे आरोग्य उपकेंद्रास मंजुरी आणली आहे. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी शिराळा औद्योगिक वसाहत, कणदूर, बिळाशी व करंजवडे येथील वीज उपकेंद्र, खराब झालेले विजेचे खांब बदलणे, पर्यटन विकासमधून शिराळा शहरात २ कोटी २६ लाख रुपयांची विकासकामे साधली आहेत.
शासनदरबारी सातत्याने प्रयत्न करून रखडलेल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेस निधी मिळवून वारणेचे पाणी उत्तर भागातील वाकुर्डे तलावात आणले. या योजनेच्या बादेवाडी ते बिऊर, वाकुर्डे ते रेड कालव्यांच्या कामे १० किलोमीटरपर्यंत पूर्ण करून पुढील दहा किलोमीटरच्या कामांना गती दिली.
भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना त्यांनी विश्वास कारखान्यासह कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची प्रगती साधताना विविध संस्थांची यशस्विपणे उभारणी केली आहे. त्यामध्ये आपला बझार, विराज इंडस्ट्रिज, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ, विश्वास कारखान्याची डिस्टिलरी, १५ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, द्रवरूप जिवाणू खतनिर्मिती प्रकल्प, चिखली कार्बनडाय ऑक्साईड गॅसेस बॉटलिंग प्रकल्प, ऊस बियाणे निर्मिती प्रकल्प, शिराळा कार्बनडाय ऑक्साईड गॅस प्रकल्प, चिखली गॅसेस, विराज हायटेक विव्हिंंग, विराज पशुखाद्य निर्मिती या प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली. भाऊंनी सहकारातील मूळ संस्था असलेल्या विश्वास कारखान्याचे व्यवस्थापन नेटके ठेवत कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम केला. यंत्रसामग्री अत्याधुनिक केली. कर्मचारी पगारवाढ, प्रत्येकवर्षी बोनस, सभासदांना अल्पदरात साखर, रुग्णवाहिका व अग्निशामक, ठिबक सिंचन अनुदान योजना, कामगार विमा योजना आदी सोयी-सुविधा निर्माण केल्या. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कारखान्यामार्फत विविध योजना राबवत सोयी-सवलती देऊ केल्या आहेत. कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणी योजनांना शासनाकडून कर्जमाफी मिळवून बहुतांशी शेतकरी कर्जमुक्त केला. कारखान्याचे एकूण कामकाजाची दखल घेऊन टीयुव्ही या जर्मन कंपनीकडून कारखान्यास आयएसओ मानांकन मिळाले आहे.
औद्योगिक प्रगती व्हायलाच हवी. त्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. पाणी मिळाल्याशिवाय शेती पिकणार नाहीत. ८० टक्के शेतकरी वर्ग असलेली ग्रामीण जनता विशेषत: महिलांच्याही प्रगतीसाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे महत्त्वाचे आहे शिवाय बचतगटांच्या माध्यमातून संघटित असलेल्या महिलांनी विविध छोटे-मोठे उद्योग, व्यवसायात यायला हवे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत, कूपनलिका (बोअर), आरोग्य शिबिरे, पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व परीक्षा, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, रक्तदान, पत्रकार विमा योजना, कुमार-युवा साहित्य संमेलन आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
भाऊंच्या दूरदृष्टीतून विश्वास व विराज उद्योग समूहाने शिराळा तालुक्यात किंबहुना मतदारसंघात अल्पावधित गरूडझेप घेतली आहे. मतदारसंघातील जनतेने दिलेले प्रेम, दाखविलेला विश्वास व जिव्हाळा असाच कायम राहिल्यास मानसिंगभाऊ आगामीकाळात असेच यश प्राप्त होवो हीच वाढदिनाच्या दिवशी शुभेच्छा...!
- श्रीराम पुरोहित,
गौरव प्लास्टिक्स, नागपूर