शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

सांगलीत तरुणीस पळवून नेऊन लैंगिक अत्याचार; बोरगावच्या तरुणास दहा वर्षांची सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:32 IST

पीडिता गर्भवती राहिल्यानंतर समोर आली होती घटना

सांगली : कॉलेजला निघालेल्या तरुणीस पळवून नेऊन धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राहुल मानसिंग चव्हाण (वय २४, रा. झरोना मळा, बोरगाव, ता. तासगाव) याला १० वर्षे सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे आरती साटविलकर यांनी खटला चालवला.खटल्याची हकीकत अशी, पीडिता ही दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. आरोपी राहुल याने तिला कॉलेजला सोडतो असे सांगून दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर राहुल याने तिला तासगावात आणले. तेथे एका मोटारीत जबरदस्तीने बसवले. मित्रांच्या मदतीने हातनूर येथील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तिने आरडाओरड करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच तिला व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने घरातील लोकांना हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर दि. १६ जून २०२० रोजी पीडितेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. घरच्यांनी तिला दवाखान्यात दाखवले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती गर्भवती असल्याचे सांगितले. आई-वडिलांनी चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार व आरोपीचे नाव सांगितले. आरोपी राहुल विरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपनिरीक्षक आर. आर. साळोखे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर पीडित तरुणीचा गर्भपात केला.खटल्यात सरकारी वकील आरती साटविलकर यांनी १४ साक्षीदार तपासले. पीडिता, तिचे कुटुंबीय यांचा जबाब, वैद्यकीय पुरावा, रासायनिक विश्लेषण अहवालावरून आरोपी राहुल याला लैंगिक अत्याचाराबद्दल दोषी ठरवले. त्याला दहा वर्षे सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही दिला. तासगाव पोलिस ठाण्यातील कर्मचारी रवींद्र माळकर, पैरवी कक्षातील सुनीता कांबळे, रेखा खोत, वंदना मिसाळ यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Teen Kidnapped, Sexually Assaulted; Accused Gets 10 Years

Web Summary : A Borgaon youth received a 10-year sentence for kidnapping and sexually assaulting a college girl in Sangli. The accused lured her, held her captive with friends, and committed the crime. She later became pregnant, revealing the ordeal. The court also imposed a fine.