शहीद सुरेश चव्हाण यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा : नितीन बानुगडे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:49+5:302021-07-05T04:17:49+5:30
कवठेमहांकाळ : देशहितासाठी बलिदान दिलेल्या शहीद सुरेश चव्हाण या भारतमातेच्या वीरपुत्राचा आदर्श आजच्या तरुणांनी डोळ्यांसमोर ठेवावा. घडण्याच्या वयात घडावे ...

शहीद सुरेश चव्हाण यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा : नितीन बानुगडे-पाटील
कवठेमहांकाळ : देशहितासाठी बलिदान दिलेल्या शहीद सुरेश चव्हाण या भारतमातेच्या वीरपुत्राचा आदर्श आजच्या तरुणांनी डोळ्यांसमोर ठेवावा. घडण्याच्या वयात घडावे व लढण्याच्या वयात समाजासाठी लढावे, असे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
करोली टी (ता. कवठेमहांकाळ) येथे ६ जुलै रोजी होणाऱ्या कारगील विजय दिवस व शहीद सुरेश चव्हाण शहीद दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. बानुगडे-पाटील बोलत होते. ते म्हणाले, शहीद सुरेश चव्हाण मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम स्तुत्य आहेत. हे उपक्रम कायम सुरू राहावेत.
यावेळी प्रा. बानुगडे-पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयाेजित रक्तदान शिबिरामध्ये ९२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख मारुती पवार, सलगरेचे सरपंच तानाजीराव पाटील, डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, मुंबई महापौर केसरी रवी गायकवाड, वीरपत्नी फुलबाई चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शहीद सुरेश चव्हाण यांचे पुत्र दत्तात्रय चव्हाण, संदीप चव्हाण, विशाल गिड्डे, सचिन पाटोळे, मेजर सुभाष चव्हाण यांनी केले.