शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत मद्यधुंद टोळक्याची हुल्लडबाजी, लावणी कार्यक्रमात नाचवले रिव्हॉल्व्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:58 IST

संयोजकांनी समजावण्याचा व आवरण्याचा प्रयत्न करताना त्यांनाच धक्काबुक्की करण्यात आली

सांगली : येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नृत्यांगना दीप्ती आहेर यांच्या लावणी शोमध्ये मद्यधुंद टोळक्याने हुल्लडबाजी केली. त्यांनी धिंगाणा घालत रिव्हॉल्व्हर नाचविल्याचे संयोजक मारुती गायकवाड यांनी सांगितले. त्यांना समजावण्याचा व आवरण्याचा प्रयत्न करताना गायकवाड यांनाच धक्काबुक्की करण्यात आली.  या प्रकाराबाबत पोलिसप्रमुखांना निवेदन देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नऊ वर्षांंच्या प्रतीक्षेनंतर रविवारी (दि. १३) मंगेशकर नाट्यगृहात लावणी शो झाला. मारुती गायकवाड  व सहकाऱ्यांनी नियोजन केले होते. लावणीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक आले होते. कार्यक्रम मध्यंतराला आल्यानंतर एका टोळक्याने गाेंधळ घालायला सुरुवात केली. शिट्ट्या मारणे, आरडाओरड करणे असे प्रकार सुरू झाले. अन्य प्रेक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते शांत झाले नाहीत.शेवटी गायकवाड यांनीच हस्तक्षेप केला. तरुणांना शांत बसून लावणीचा आनंद घेण्याची विनंती केली; पण त्यांनी गायकवाड यांनाच धक्काबुक्की केली. त्यांतील एका तरुणाने रिव्हॉल्व्हर काढून ते नाचविले. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विनंती करूनही त्यांना आवर घालता आला नाही, असे मारुती गायकवाड यांनी सांगितले.दरम्यान, गायकवाड म्हणाले की, नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमावेळी असे प्रकार घडल्यास त्यांना कला सादर करण्यात अडचणी येतील. भविष्यात ते सांगलीत कार्यक्रम देण्यास टाळाटाळ करतील.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी