शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो, उज्ज्वल भवितव्यासाठी ज्ञानाची कास धरा

By admin | Updated: August 2, 2015 23:08 IST

उदय निर्गुडकर : इस्लामपुरात राजारामबापू व्याख्यानमालेत आवाहन

इस्लामपूर : देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. ऐहिक सुखाचा त्याग करा, मात्र ज्ञानाच्या सुखाचा त्याग करु नका. ज्ञानाची कास धरा. तुमचे भवितव्य उज्ज्वल असेल. त्यासाठी तरुण पिढीने मूलभूत संशोधनाकडे वळावे, असे आवाहन ज्येष्ठ संशोधक व पत्रकार डॉ. उदय निर्गुडकर यांनी केले.येथील राजारामबापू नाट्यगृहात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेल्या नगर व्याख्यानमालेत डॉ. निर्गुडकर यांनी ‘स्वप्न पाहा, स्वप्न जगा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. हे व्याख्यान ताजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना समर्पित केले. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याहस्ते या पाचव्या वर्षीच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, लोकनेते राजारामबापू पाटील, लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.डॉ. निर्गुडकर म्हणाले, सध्या शिक्षण घेणाऱ्यांसह अंधश्रध्दाळूंची संख्या वाढते आहे. कायदा करूनही अज्ञान-अंधश्रध्दा दूर होत नाही. संवादाची साधने वाढत असताना, मानसिक असुरक्षितता वाढते आहे. त्यामुळेच सध्या भांडवली आणि जातीय अशा तत्त्वप्रणालींचे राज्य आहे. जागतिकीकरणाचे लाभ शेवटच्या स्तरापर्यंत न पोहोचल्याने गरिबीचे प्रचंड मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे यापुढे शिक्षणाची गुणवत्ता उंचावून त्यावरील गुंतवणूकही वाढवली पाहिजे. घनकचरा, ई-कचरा व्यवस्थापनाची मोठी गरज भासेल. माहिती-तंत्रज्ञानात उद्याचे विश्व भारताचे आहे. त्यामुळे युवा पिढीने मोठी स्वप्ने पाहताना मूलभूत संशोधनाकडे वळावे.आ. जयंत पाटील म्हणाले, आमचा परिसर आणि इथले नागरिक वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ झाले पाहिजेत, या उद्देशाने ही व्याख्यानमाला घेत आहोत. वैचारिक अभिसरणाच्या या उपक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, याचा आनंद वाटतो.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी स्वागत, अ‍ॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक, डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन, उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. व्यासपीठावर सदाभाऊ खोत, विजयभाऊ पाटील, खंडेराव जाधव, अरुणादेवी पाटील, शहाजी पाटील, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, प्रा. शामराव पाटील, विनायकराव पाटील, सुधीर पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)तुम्हास वाटते तसे नाही..!स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत श्रोत्यांमध्ये बसले होते. आ. जयंत पाटील यांनी त्यांना व्यासपीठावर येण्याचे निमंत्रण देताना, मी त्यांचा हितचिंतक आहे. मात्र माझ्याजवळ येण्याने त्यांना त्रास होईल, अशी भीती वाटते, असे म्हटले होते. त्याचा धागा पकडत डॉ. निर्गुडकर यांनी जयंतरावांना टोला मारताना, तुम्हास जे वाटते, तसे आम्हास वाटत नाही. तेथे (मंत्रिपदावर) वर्णी लागण्यासाठी काय त्रास, वेदना आहेत, त्या त्यांनाच (सदाभाऊंना) ठावूक, असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.कृतिशील अन् निष्कलंक नेता..!डॉ. निर्गुडकर म्हणाले की, कामाच्या निमित्ताने अनेक नेत्यांशी भेटता, बोलता आले. अनेकांचे घोटाळे समोर आले. बहुतांश नेते घोटाळ्यात अडकले. मात्र आमदार जयंत पाटील हे कृतिशील व निष्कलंक नेते ठरले आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मिळत नाही. लोकनेते बापूंच्या स्मृतिदिनी समाजाला विचार देण्याची त्यांची कृतिशील दूरदृष्टी अभिनंदनीय आहे.