पेठजवळ वाहनाच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:55+5:302021-03-04T04:50:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : पेठ-शिराळा रस्त्यावरील माळी मळा परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील २७ वर्षीय युवक जागीच ...

Young man killed in vehicle collision near Peth | पेठजवळ वाहनाच्या धडकेत तरुण ठार

पेठजवळ वाहनाच्या धडकेत तरुण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : पेठ-शिराळा रस्त्यावरील माळी मळा परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील २७ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२.३० च्या सुमारात घडली. अपघातातील धडक देणारे वाहन निघून गेले.

सुधीर सुरेश मिरासदार (वय २७, रा. शिराळा बसस्थानकाच्या पाठीमागे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश दामोदर मिरासदार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

सुधीर हा पत्नीसमवेत इस्लामपूरमध्ये राहत होता, तर त्याचे आई-वडील शिराळा येथे राहतात. मंगळवारी रात्री तो आई-वडिलांना भेटून दुचाकीवरून (क्र. एमएच १० एएच ६५११) इस्लामपूरला येत होता. माळी मळ्याजवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाची त्याच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेत सुधीर हा जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि बहिणी असा परिवार आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Young man killed in vehicle collision near Peth