सांगलीत डंपरच्या धडकेत तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:13+5:302020-12-11T04:53:13+5:30
सांगली : शहरातील शामरावनगर येथे डंपरने दिलेल्या धडकेत तरुण ठार झाला. गणेश आनंदराव माळी (वय २५, रा. ज्येष्ठराज कॉलनी, ...

सांगलीत डंपरच्या धडकेत तरुण ठार
सांगली : शहरातील शामरावनगर येथे डंपरने दिलेल्या धडकेत तरुण ठार झाला. गणेश आनंदराव माळी (वय २५, रा. ज्येष्ठराज कॉलनी, शामरावनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास चालत तो घरी जात असताना हा अपघात झाला.
गुरुवारी सायंकाळी शामरावनगरमध्ये गणेश हा चालत घरी चालला होता. याचवेळी आलेल्या भरधाव डंपरने त्याला जोरदार धडक दिल्याने गणेशच्या डोक्याला मार लागला. त्याच्या नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहर पोलिसात घटनेची नोंद आहे.
अविवाहित असलेला गणेश मजुरीचे काम करत होता. तो आईसमवेत राहत होता, तर त्याच्या बहिणीचे लग्न झालेले आहे.