शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून दोघा भावांकडून तरुणाचा खून; तिघांना अटक

By अविनाश कोळी | Updated: January 15, 2024 17:06 IST

कुपवाड : बहिणीबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या राग मनात धरून बामणोली, दत्तनगर ( ता. मिरज) येथील ओम श्रीधर देसाई (वय १९ ...

कुपवाड : बहिणीबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या राग मनात धरून बामणोली, दत्तनगर ( ता. मिरज) येथील ओम श्रीधर देसाई (वय १९ रा.दत्तनगर, बामणोली) या युवकाचा संशयित ओंकार जावीरसह अन्य तिघांकडून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. काल, रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास दत्तनगर मधील खुल्याजागेत ही घटना घडली. या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी जावीरसह त्याच्या इतर तिघा मित्रावर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओंकार निलेश जावीर (वय २०), रोहित बाळासाहेब केंगार (१८), सोहम शहाजी पाटील (२०), ज्ञानेश्वर पाटील (२०, रा. चौघेही दत्तनगर,बामणोली) यांचा समावेश आहे. यापैकी ओंकार जावीर आणि सोहम पाटील याला अटक केली आहे. तर कुपवाड पोलीसांनी रोहित केंगार याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर पाटील फरार आहे. मृत ओम देसाई याचा भाऊ आदेश देसाई यांनी या घटनेची कुपवाड पोलीसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ओम देसाई हा  कुपवाड एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास ओम हा जेवण करून कुटुंबीयांसोबत बसला होता. दरम्यान संशयित ओंकार जावीर याने मृत ओमला दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ओंकारने ओम याला तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस असा जाब विचारला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली.

दरम्यान, जावीर आणि त्याचे मित्र सोहम पाटील, ज्ञानेश्वर पाटील व रोहित केंगार याने चाकू व कोयत्याने ओमच्या पोटात व डोक्यावर सपासप वार केले. या खूनी हल्ल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी आरडाओरडा पाहून लगतच असलेला त्याचा भाऊ घटनास्थळी दाखल झाला. ओमला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओमचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस