कवठेएकंद येथे अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:35 IST2021-02-27T04:35:24+5:302021-02-27T04:35:24+5:30

कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासागव) येथे तासगाव-सांगली मार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व दुचाकीत झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. ...

Young man killed in accident at Kavtheekand | कवठेएकंद येथे अपघातात तरुण ठार

कवठेएकंद येथे अपघातात तरुण ठार

कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासागव) येथे तासगाव-सांगली मार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व दुचाकीत झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. पंकज महावीर खाडे (वय २५, रा. कवठेएकंद) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

पंकज खाडे याने तासगाव येथे बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या केमिकल साहित्य विक्रीचा व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केला होता. गुरुवारी रात्री तासगावहून तो दुचाकीने (एम. एच. १०. बीएल. ९१०८) कवठेएकदकडे येत होते. यावेळी उसाने भरलेला ट्रॅक्टर (एम.एच. १०. सी. एक्स. ६२९७) सांगलीच्या दिशेने निघाला होता. कवठेएकंदनजीक एका हॉटेलसमोर या दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला. यात पंकज याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: Young man killed in accident at Kavtheekand