शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

'हळदी'च्या अंगानिशी सांगलीचा योगेश निघणार 'सिंदूर' मोहिमेवर, सीमेवर आज रवाना होणार

By घनशाम नवाथे | Updated: May 10, 2025 12:10 IST

घनशाम नवाथे सांगली : घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे ४० दिवसांच्या सुटीवर तो आला. पाच तारखेला लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी ...

घनशाम नवाथेसांगली : घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे ४० दिवसांच्या सुटीवर तो आला. पाच तारखेला लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी सैन्यदलाच्या सर्व सुट्या रद्द करून कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश आला. ते ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तो राजस्थानमध्ये रणगाडा चालवण्यास जात आहे. शनिवारी दुपारी रेल्वेने रवाना होत असल्याचे सांगलीतील जवान योगेश आलदर याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आलदर कुटुंब मुळचे कोळे (ता. सांगोला) येथील आहे. कोळे येथील अनेक कुटुंबे पोटापाण्यासाठी सांगलीत स्थायिक आहेत. योगेशच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. शालेय जीवनात असतानाच त्याला आठवी-नववीपासून सैन्यात जाण्याचे वेड होते. शांतिनिकेतन येथील शाळेत शिकत असतानाच घराजवळ असलेल्या मैदानावर सराव करत होता. बारावी झाल्यानंतर तो २०१९ मध्ये सैन्य दलात भरती झाला. घरातील सर्वांनाच आनंद झाला. योगेश सध्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये तो रणगाडा चालक म्हणून कार्यरत होता. त्याची नियुक्ती राजस्थानमधील श्री गंगानगर भागात आहे.पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या. बाज (ता. जत) येथील मुलगी पसंत पडली. ५ मे रोजी लग्न ठरले. त्यामुळे दि. ३० एप्रिल रोजी तो ४० दिवसाची सुटी घेऊन सांगलीत आला. ५ मे रोजी लग्न झाले. सर्व कुटुंबीय आनंदात होते. तेवढ्यात सीमेवर युद्ध सुरू झाल्यामुळे सैन्यदलाच्या सुट्या रद्द करून सर्वांना परत बोलवण्यात आले. दि. ७ रोजी योगेशने मोबाइलवर मेसेज पाहिला.

वाचा- ...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?

कर्तव्यावर हजर होणे अत्यंत महत्वाचेपुन्हा कर्तव्यावर जावे लागणार असल्याचे सांगताच पत्नीसह सर्वांना धक्का बसला. सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. ‘आत्ताच लग्न झाले आहे, अजून अंगावरची हळद निघाली नाही, जाऊ नकोस’ असे सर्वजण विनवणी करू लागले. परंतु योगेशने कशीबशी सर्वांची समजूत काढली. सर्व सहकारी जवान हजर झाले आहेत, देशसेवेसाठी जाणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले. शनिवारी दुपारी सांगलीतून राजस्थानकडे रवाना होत आहे. राजस्थान परिसरात अद्याप युद्धाच्या हालचाली नसल्या तरी सर्व सैनिक सज्ज आहेत. त्यामुळे जावेच लागणार असल्याचे योगेशने सांगितले.

आजी-आजोबांच्या डोळ्यात पाणीनातवाला सैन्यात नोकरी लागली, लग्नही झाले म्हणून योगेशचे आजी-आजोबा आनंदात होते. परंतु जेव्हा योगेशला परत ड्युटीवर बोलवल्याचे समजले तेव्हा धक्काच बसला. शुक्रवारी योगेश भेटायला गेल्यानंतर त्यांनी रडतच त्याला आणखी थोडे दिवस थांब अशी विनंती केली. परंतु योगेशने त्यांची कशीबशी समजूत काढली.

टॅग्स :SangliसांगलीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान