शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यात प्रथमच दिसला पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:22 IST

पाठीवर पिवळे गडद ठिपके आणि त्याच्यासोबत समांतर रेषा असणारा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या हा बिनविषारी साप शिराळा शहरामध्ये प्रथमच दिसला. पण अज्ञातांनी मण्यार जातीचा विषारी सर्प समजून त्याला मारून टाकले.

ठळक मुद्देशिराळा तालुक्यात प्रथमच दिसला पिवळ्या ठिपक्याचा कवड्या सापमण्यार जातीचा विषारी सर्प समजून मारले

शिराळा (जि. सांगली) : पाठीवर पिवळे गडद ठिपके आणि त्याच्यासोबत समांतर रेषा असणारा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या हा बिनविषारी साप शिराळा शहरामध्ये प्रथमच दिसला. पण अज्ञातांनी मण्यार जातीचा विषारी सर्प समजून त्याला मारून टाकले.बिनविषारी असलेला हा साप देशात फार कमी ठिकाणी आढळतो. यापूर्वी मध्य भारत, उत्तर-पश्चिम घाट, मध्य पश्चिम भारत या भागामध्ये या सापाची नोंद आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाजवळील काही भागात तसेच नाशिक, पुणे, मुळशी, तळेगाव, सांगली, बुलढाणा तसेच गुजरातमधील काही भागात हा साप आढळल्याचे दिसून येते.काळ्या शरीरावर ठळक पिवळे ठिपके व त्याला लागूनच समांतर रेषा, तोंडाजवळील ओठाकडचा आणि पोटाकडचा भाग पांढऱ्या रंगाचा दिसून येतो. बऱ्यांचवेळा हा साप मण्यार म्हणून नागरिकांकडून मारला जातो. त्यामुळे या सापाची संख्या फार कमी राहिली आहे.

पूर्ण वाढ झालेल्या या सापाची लांबी एक ते दीड फुटापर्यंत असते. ते साधारणत: रात्रीच्यावेळी बाहेर पडतात आणि पाली, सापसुरळी आदींवर गुजराण करतात. शिराळ्यामध्ये हा साप प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सर्प अभ्यासक प्रणव महाजन आणि सहकाऱ्यांनी नोंदवला आहे.या सापाची नोंद महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या शिराळा विभागाच्या लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये होणार आहे. हा साप सापडला तेव्हा मृतावस्थेत होता. अज्ञातांकडून त्याला मण्यार असल्याचे समजून मारण्यात आले असावे, असा अंदाज वनविभागाने वर्तविला. त्यामुळे या सापाची पहिली नोंद ही मृतावस्थेत झाली आहे. नागरिकांनी कोणताही साप मारू नये. वन विभागाशी संपर्क साधून त्याला सुरक्षितरित्या निसर्गात सोडण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforestजंगलSangliसांगली