शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

Sangli News: ‘यशवंत’मधील कामगारांच्या आंदोलनाची आज पन्नाशी; काळी गुढी उभारुन चटणी-भाकरी खाऊन करणार निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:28 IST

आंदोलनाची प्रशासनासह बँकेनेही घेतली नाही दखल

दिलीप मोहितेविटा : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी जिल्हा बँकेकडे असलेली थकीत पगाराची रक्कम मिळावी, या मागणीसाठी दि. १ फेब्रुवारीपासून विटा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज गुढीपाडव्यादिवशी ५० वा दिवस आहे. आंदोलनाची प्रशासनासह बँकेनेही दखल न घेतल्याने कामगार आंदोलनस्थळी काळी गुढी उभी करून पुरणपोळीऐवजी चटणी-भाकरी खाऊन निषेध करणार आहेत.यशवंत साखर कारखाना जिल्हा बँकेने लिलावात काढल्यानंतर कामगारांच्या पगाराची ८ कोटी २८ लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेच्या ताब्यात आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ही रक्कम बँक वापरत आहे. त्यामुळे कारखान्याच्या सुमारे ९०० हून अधिक कामगारांची रक्कम देऊन कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बँकेने दिलासा द्यावा, अशी मागणी करीत कामगारांनी दि. १ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. शेकाप, शेतकरी सेनेसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.महसूल प्रशासन, बँक अधिकारी व संघटनेच्या बैठका झाल्या. परंतु तोडगा निघाला नाही. त्यामुळे मोर्चा, रास्ता रोको, धरणे आदी आंदोलने झाली. त्याकडे बॅँकेने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या आंदोलनाचा गुढीपाडव्यादिवशी ५० वा दिवस आहे. इतक्या दिवसांचे आंदोलन करूनही कामगारांना दुर्लक्षित केल्याने संताप व्यक्त होत आहे.याचा निषेध म्हणून बुधवारी आंदोलनस्थळी काळी गुढी उभी करण्यात येणार आहे. मराठी वर्षातील पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यादिवशी सर्वत्र पुरणपोळी असताना आंदोलनकर्ते कामगार मात्र चटणी, खर्डा व भाकरी खाऊन गुढीपाडवा साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले.कामगारांकडे लक्ष कोण देणार?हक्काच्या थकीत पगारासाठी यशवंत साखर कारखान्याचे कामगार गेल्या ५० दिवसापासून आंदोलनास बसले आहेत. या कामगारांना न्याय देण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढे येऊन प्रश्न सोडविण्यास तयार नाही. म्हणूनच कामगारांना उन्हाळ्यातही आंदोलनास बसावे लागत आहे. प्रशासनही न्याय देत नसल्यामुळे कमगार नाराज आहेत.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेagitationआंदोलनgudhi padwaगुढीपाडवा