प्रकाश हॉस्पिटलमध्ये आज काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:03+5:302021-05-27T04:29:03+5:30

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले जात ...

Work stoppage agitation at Prakash Hospital today | प्रकाश हॉस्पिटलमध्ये आज काम बंद आंदोलन

प्रकाश हॉस्पिटलमध्ये आज काम बंद आंदोलन

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याच्या निषेधार्थ गुरुवार, २७ मे रोजी हॉस्पिटलमधील कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. अध्यक्ष अभिजित पाटील आणि सचिव कुलदीप खांबे यांनी ही माहिती दिली.

याबाबतचे निवेदन येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

जोपर्यंत दाखल गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निवेदनात इशारा दिला आहे. नवीन कोविड रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत आणि सद्यस्थितीत जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांची इतर कोविड सेंटरमध्ये प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

प्रकाश हॉस्पिटलमध्ये आज अखेर दीड हजार कोरोना रुग्णांना सेवा दिली आहे. डॉक्टर आणि सहकारी कर्मचारी बाधित झाले. त्यावर मात करत पुन्हा हे सर्वजण सेवा बजावत आहेत. मात्र राजकीय दबावाने रुग्णांच्या नातेवाईकांना हाताशी धरून, त्यांची दिशाभूल करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय लोकप्रतिनिधी हॉस्पिटल बाबत खोट्या निनावी तक्रारी प्रशासनाकडे करत आहेत. त्यातून प्रशासन राजकीय दबावापोटी हॉस्पिटलची चौकशी करत आहे. खोटे गुन्हे मागे घेऊन न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

Web Title: Work stoppage agitation at Prakash Hospital today