प्रेरणा फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : एस. टी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:59+5:302021-01-13T05:10:59+5:30

कामेरी : समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा फाउंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार ...

The work of Prerna Foundation is commendable: S. T. Patil | प्रेरणा फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : एस. टी. पाटील

प्रेरणा फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : एस. टी. पाटील

कामेरी : समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा फाउंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा तरच बहुजनांसाठीची शैक्षणिक चळवळ अविरत सुरू राहील, असे प्रतिपादन विद्यामंदिर हायस्कूल इस्लामपूरचे मुख्याध्यापक एस. टी. पाटील यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रेरणा फाउंडेशन येडेनिपाणीच्या वतीने गरीब व गरजू १७ विद्यार्थ्यांना पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कापड व्यापारी बेहरू ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रेरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित लोखंडे, महिला विभाग प्रमुख मीरा शिंदे उपस्थित होत्या. प्रतिमा रंकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिव सचिन यादव यांनी प्रास्ताविक केले, मुल्ला यांनी आभार मानले.

फोटो : १२०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज

ओळ : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे प्रेरणा फाउंडेशनच्या कार्यक्रमात एस. टी. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बेहरू ओसवाल, सचिन यादव, अजित लोखंडे, मीरा शिंदे, प्रतिमा रंकाळे उपस्थित होत्या.

Web Title: The work of Prerna Foundation is commendable: S. T. Patil