पक्ष बळकटीसाठी कामाला लागा

By Admin | Updated: April 27, 2016 00:46 IST2016-04-26T23:29:31+5:302016-04-27T00:46:40+5:30

स्मिता पाटील : कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी पदाधिकारी निवडी मेळावा

Work for the party's strength | पक्ष बळकटीसाठी कामाला लागा

पक्ष बळकटीसाठी कामाला लागा

कवठेमहांकाळ : युवक राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष बळकटीसाठी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या स्मिता पाटील यांनी केले. सोमवारी कवठेमहांकाळ येथे युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी स्मिता
पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय सगरे होते
यावेळी युवक राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदी बोरगावच्या गणेश पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र स्मिता पाटील, विजय सगरे, ताजुद्दीन तांबोळी, नामदेवराव करगणे यांच्याहस्ते देण्यात आले.
स्मिता पाटील पुढे म्हणाल्या, आबांच्या विचाराने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. विजय सगरे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष नेहमीच युवकांना न्याय देत आला आहे. यापुढेही न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल. तालुक्यात युवकांची मोठी फळी उभारू व सुमनतार्इंना ताकद देऊ, असे युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी म्हणाले.यावेळी नामदेवराव करगणे यांचेही भाषण झाले. दत्ताजीराव पाटील, मनोहर पाटील, विकास हाक्के, साहेबराव पाटील (बोरगावकर), हणमंत शिंदे, अमोल ओलेकर उपस्थित होते. (वार्ताहर)

आबांच्या विचाराने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्मिता पाटील यांनी केले. यावेळी युवक राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी अमर शिंदे यांची, तर जिल्हा उपाध्यक्षपदी मोहन खोत यांची निवड करण्यात आली.

Web Title: Work for the party's strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.