माॅडेल स्कूलचे काम बुधगावात रेंंगाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST2021-07-09T04:17:57+5:302021-07-09T04:17:57+5:30
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ ची माॅडेल स्कूल अंतर्गत निवड झाली; पण एकही ...

माॅडेल स्कूलचे काम बुधगावात रेंंगाळले
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ ची माॅडेल स्कूल अंतर्गत निवड झाली; पण एकही काम सुरू न झाल्याने, पालकांतून संताप व्यक्त होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्याचे दिसते.
पालकमंत्री जयंत पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माॅडेल स्कूलमध्ये सुरुवातीला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी विविध कामे करण्यात येणार आहेत. बुधगावच्या २ नंबर शाळेची यासाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडांगण, कुंपण, हॅडवाॅश स्टेशन आणि सौरऊर्जा यंत्रणा अशी कामे मंजूर झाली आहेत. यासाठीचा निधीही संबंधित खात्यांवर वर्ग झाला आहे.
क्रीडांगणाच्या कामाचे भूमिपूजन होऊन तीन महिने झाले. मात्र, एकही काम सुरू होऊ शकले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे अक्ष्यम्य दुर्लक्ष होत आहे. संबंधित जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी याबाबत वेळकाढूपणा करत आहेत. जिल्ह्यातील इतर माॅडेल स्कूलची कामे मार्गी लागली आहेत. मात्र, बुधगावच्या या शाळेबाबत होणाऱ्या दुर्लक्षाबाबत पालकांतून याबाबत संताप व्यक्त होत आहे.