शेटफळेत दिघंची-हेरवाड मार्गाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST2021-03-21T04:25:01+5:302021-03-21T04:25:01+5:30
दिघंची-हेरवाड महामार्गाचे सध्या काम जोरात सुरू असताना शेटफळे गावातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला जात आहे. मात्र काही मीटरवर रस्त्याचे ...

शेटफळेत दिघंची-हेरवाड मार्गाचे काम रखडले
दिघंची-हेरवाड महामार्गाचे सध्या काम जोरात सुरू असताना शेटफळे गावातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला जात आहे. मात्र काही मीटरवर रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. एकाच बाजूने चारशे ते पाचशे मीटर रस्ता केला मात्र एका बाजूने केला नाही परिणामी एक ते दीड फूट रस्ता उंच आसल्याने रस्त्यावरून एकच वाहन जात आहे. शिवाय कोणत्याही प्रकारचे संरक्षक यंत्रणा लावली नसल्याने अनेक अपघात घडत आहेत.
दरम्यान शेटफळेतून जात असणारा हा महामार्ग अनेक महिन्यापासून वादातीत आहे. शेटफळे गावातील अतिक्रमणे नसतानाही ग्रामसेवकांनी अतिक्रमण हटविल्याने ते अधिकच वादातीत बनले आहे. महामार्गाच्या कामाबाबत शेटफळे गावात दोन गट निर्माण झाले आहेत. महामार्गासाठी कोणाचाच विरोध नाही, मात्र अतिक्रमण नसतानाही अनेकांची घरे पाडली गेली आहेत, त्याच्या नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.
आतापर्यंत शेटफळे गावातून असणारा सिमेंटचा रस्ता व त्याच्या दुतर्फा झालेली गटर ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत. महामार्ग उत्कृष्ट होण्यासाठी गावातील लोकांनी व नेतेमंडळींनी पुढाकार घेणे गरजेचे आसताना काही नेते मंडळी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महामार्गाचे काम निकृष्ट बनत आहे.