इंधन दरवाढीविरुद्ध कामेरीत महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:29 IST2021-03-01T04:29:45+5:302021-03-01T04:29:45+5:30

फोटो ओळ : कामेरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष छाया पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात ...

Women's Nationalist Movement in Kameri against fuel price hike | इंधन दरवाढीविरुद्ध कामेरीत महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

इंधन दरवाढीविरुद्ध कामेरीत महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

फोटो ओळ : कामेरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष छाया पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चुलीवर स्वयंपाक केल्याचे प्रतीकात्मक आंदोलनही करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : भाजप सरकारने केलेल्या अन्यायी पेट्रोल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष छाया पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामेरी येथील पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात चारपेक्षा जास्त लोक एकत्र जमण्यास, आंदोलन करण्यास बंदी असल्याने अवघ्या चार महिलांच्या उपस्थितीत हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती तात्काळ कमी करून सामान्यांना न्याय न दिल्यास यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे छाया पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात चुलीवर स्वयंपाक केल्याचे प्रतीकात्मक आंदोलनही करण्यात आले. यावेळी कामेरी महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा अलका पाटील, मंगलाताई बिळासकर, सुनीता जाधव या सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women's Nationalist Movement in Kameri against fuel price hike