राजाराम देशमुखांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:26 IST2021-03-10T04:26:56+5:302021-03-10T04:26:56+5:30
महिला दिनानिमित्त श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी नारीशक्तीचा सन्मान करत मंदिरातील समस्त कर्मचारी, महिला भगिनींना ...

राजाराम देशमुखांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा
महिला दिनानिमित्त श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी नारीशक्तीचा सन्मान करत मंदिरातील समस्त कर्मचारी, महिला भगिनींना पुष्प देऊन व केक कापून जागतिक महिला दिन साजरा केला.
महिला दिन साजरा करण्यासाठी राजाराम देशमुख यांच्यासमवेत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त व महिला प्रतिनिधी श्वेता अवर्सेकर (हेगडे), आरती साळवी, वैशाली पाठणकर, ट्रस्टच्या कार्यकारी व्यवस्थापक प्रियंका कुलकर्णी-छापवाले उपस्थित होते.
यासोबतच जागतिक महिला दिनानिमित्त प्रसिद्ध मालिका निर्मात्या एकता कपूर यांनी श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. देशमुख यांनी मंदिरातील समस्त कर्मचारी महिला भगिनींचा पुष्प देऊन व केक कापून जागतिक महिला दिन साजरा केला. राजाराम देशमुख यांनी एकता कपूर यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने शाल व पुष्प देऊन सन्मान केला.