Sangli: माडग्याळ येथे मटका अड्ड्यावरच महिला सरपंचांनी मारला ठिय्या, मटका एजंटाची उडाली भंबेरी
By हणमंत पाटील | Updated: February 15, 2024 13:36 IST2024-02-15T13:34:51+5:302024-02-15T13:36:10+5:30
उमदी : माडग्याळ (ता. जत) येथील महिला सरपंच यांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून तेथेच ...

Sangli: माडग्याळ येथे मटका अड्ड्यावरच महिला सरपंचांनी मारला ठिय्या, मटका एजंटाची उडाली भंबेरी
उमदी : माडग्याळ (ता. जत) येथील महिला सरपंच यांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून तेथेच ठिय्या मारला. या प्रकाराने मटका एजंटाची मात्र चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी सरपंच अनिता माळी, उपसरपंच बाळासाहेब सावंत, महिला सदस्या निर्मला कोरे, सविता सावंत, निकिता कांबळे, शोभा माळी, सदस्य महादेव माळी व पोलिस यांनी एकत्र येऊन कारवाई केली. जोपर्यंत जुगार अड्डा बंद होत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा घेतला व ठिय्या मारला.
माडग्याळमधील अवैध धंदे बंद करावेत, अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी आहे. तसे पोलिस ठाण्यांना पत्रव्यवहारदेखील दिलेले होते. मात्र, याकडे पोलिसानी दुर्लक्ष केले. त्यामुळे महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत मटका अड्ड्यावर थेट छापा टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी मटका एजंटानेच या महिला सदस्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे महिला सरपंच यांचे म्हणणे आहे.
शेवटी महिलांच्या मागे न हटण्याच्या भूमिकेमुळे पोलिसानी येऊन कारवाई केली. अखेर पोलिसांना येऊन एजंटला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी संशयित भीमराव महादेव पाटील (रा. संख, ता. जत) यांच्याकडून बेकायदेशीरपणे कल्याण नावाचा मटका व जुगार आकड्याचा खेळ घेत असताना असा एकूण २,५२५ रुपयांचे साहित्य जप्त केले.