भविष्य निर्वाह निधीपासून महिला वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:57+5:302021-02-20T05:15:57+5:30

इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी पेठ नाका येथे बॉम्बे रेयॉन फॅशन ...

Women deprived of provident fund | भविष्य निर्वाह निधीपासून महिला वंचित

भविष्य निर्वाह निधीपासून महिला वंचित

इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी पेठ नाका येथे बॉम्बे रेयॉन फॅशन लिमिटेड हा उद्योग उभा करण्यात आला. यामध्ये ५०० हून अधिक महिला कामगार आहेत. सध्या हा उद्योग बंद पडला आहे. या कंपनीने २०१४ पासून ते २०२० पर्यंत या महिला कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाकडे जमा केली नाही. याची सखोल चौकशी करून ही रक्कम मिळावी म्हणून त्याची तक्रार आयुक्त भविष्य निर्वाह निधी, ठाणे यांच्याकडे केली आहे.

याबाबत माहिती अशी की, आज २०० हून अधिक महिलांनी पेठ नाका येथील बॉम्बे रेयॉन कार्यालयावर धडक मारली. त्यावेळी तिथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कंपनीचे एचआर मॅनेजर सागर पाटील उपस्थित होते. महिलांच्या मागण्या आम्ही वरिष्ठांना कळवितो, असे त्यांनी जुजबी उत्तर दिले. त्यामुळे महिला अधिकच आक्रमक झाल्या होत्या. कंपनीकडे या महिलांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम रुपये कोटीच्या घरात असून, ही रक्कमच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली नसल्याचा आरोप महिला वर्गातून होत आहे. संबंधित या घोटळ्याची चौकशी करून ही रक्कम आम्हाला मिळावी, याबाबतचे निवेदन आयुक्त, भविष्य निर्वाह निधी, ठाणे यांना देण्यात आले आहे.

फोटो - १८०२२०२१-आयएसएलएम-पेठ न्यूज

पेठ येथील बॉम्बे रेयॉन कंपनीविरोधात महिलांनी धरणे आंदोलन केले.

Web Title: Women deprived of provident fund