इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) येथील ५० वर्षीय महिलेचा तिच्या घरात घुसून तिला मारहाण करत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी ११ वाजता झाला. याबाबत दोघा सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने अक्षय संजय पाटील आणि वैष्णव संजय पाटील या दोघांविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. या भावांनी दोन कुत्री पाळली आहेत. ती ये-जा करणाऱ्यांना भुंकत असतात. महिलेचा नातू सकाळी खेळत असताना पाटील याचा कुत्रा त्याच्या अंगावर धावून आल्याने तो भीतीने जोरात रडू लागला. पीडित महिला ही दोघाकडे गेली, ‘तुझी कुत्री बांधून ठेव’ असे सांगून ती घरी आली. त्यावर या दोन भावांनी काठी घेऊन महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण व शिवीगाळ केली. याचवेळी तिचे केस धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.