शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

Sangli Crime: पैसे देण्याच्या बहाण्याने मळ्यात बोलावले, महिलेचा गळा दाबून खून केला; मृतदेह दुचाकीसह कृष्णा नदीत फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:08 IST

बोरगाव येथील घटना, मृतदेहाचा शोध सुरू

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे रसिका मल्लेशी कदम (वय ३४, रा. जत, सध्या रा. ईश्वरपूर) या विवाहित महिलेचा आरोपी तुकाराम शंकर वाटेगावकर (३८, रा. बोरगाव) याने मंगळवारी गळा आवळून खून केला. आरोपीने खुनानंतर मृतदेह पोत्यात भरून महिलेच्या दुचाकीसह ताकारीच्या पुलावरून कृष्णा नदीत फेकला. पोलिसांना नदीतून दुचाकी मिळाली असून, मृतदेह अद्याप सापडला नाही. मृत महिला व आरोपीच्यात संबंध होते. त्यातून निर्माण झालेल्या वादातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जत येथून मजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील रसिका कदम व आरोपी तुकाराम वाटेगावकर या दोघांचे सात वर्षांपासून संबंध होते. रसिका या खानावळीत चपाती लाटण्याचे काम करत होत्या. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रसिका या पैशाची मागणी करत होत्या. गेल्या वर्षभरापासून या दोघांमध्ये वारंवार पैशावरून भांडण सुरू होते.दिवाळीपूर्वी रसिका या तुकारामच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तुकाराम व त्यांच्या पत्नीसोबत रसिका यांचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरून तुकाराम याने रसिकाच्या घरी जाऊन मद्यधुंद अवस्थेत दंगा केला होता. आजूबाजूच्या लोकांनी तुकारामला चोपही दिला होता. हे भांडण पोलिसांत गेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना समज दिली होती.तुकारामने महिलेला पैसे देण्याच्या बहाण्याने मंगळवारी बोरगावला मळ्यात बोलावले. रात्री ९च्या सुमारास शेतातील शेडमध्ये तिचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक समाधान घुगे करत आहेत. मृत रसिकाच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकलाखून केल्यानंतर तुकारामने महिलेचा मृतदेह पोत्यात भरून तिच्याच दुचाकीवरून नेला. ताकारीच्या पुलावरून दुचाकीसह मृतदेह नदीत फेकून दिला. रात्रभर आई घरी आली नसल्याने रसिकाच्या मुलाने ईश्वरपूर पोलिसांत आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.गुन्ह्याची कबुलीमहिलेच्या कुटुंबीयांनी तुकारामवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दुपारी चार वाजल्यापासून पाण्यात मृतदेहाचा शोध घेतला. पाण्यात टाकलेली दुचाकी सापडली; मात्र उशिरापर्यंत मृतदेह सापडला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Woman Murdered, Body Thrown in River, Accused Arrested

Web Summary : In Sangli, a man murdered his lover after arguments over money. He dumped her body and her scooter into the Krishna River. The accused has been arrested, but the body remains missing.