शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आरगमध्ये बचत गटाचे नऊ लाखांचे कर्ज घेऊन महिला गायब, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:55 IST

बचत गटातील इतर महिलांच्या नावावर बँकेतून पावणे नऊ लाख कर्ज घेतले

मिरज : आरग (ता. मिरज) येथे परिसरात बचत गटातून घरगुती व्यवसायासाठी नऊ लाखांचे कर्ज घेऊन महिला परिवारासोबत फरार झाली. बचत गटातील महिलांच्या ८ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी सविता राजकुमार चौगुले (रा. स्टेशन रोड, आरग) यांच्या तक्रारीवरून वंदना प्रताप कवाळे, प्रताप आप्पासाहेब कवाळे, ओंकार प्रताप कवाळे आणि आदित्य प्रताप कवाळे (सर्व रा. आरग, ता. मिरज) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, वंदना कवाळे ही बचत गट चालवत होती. तिने दुसऱ्या बचत गटाची अध्यक्ष मीनाक्षी कोळी, सविता चौगुले व अन्य महिलांचा विश्वास संपादन केला. घरगुती व्यवसायासाठी वंदना कवाळे हिने कोळी यांच्या बचत गटातील सविता चौगुले व इतर महिलांच्या नावावर बँकेतून पावणे नऊ लाख कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम दीड वर्षात परत फेड करण्याचे तिने आश्वासन दिले. मात्र, कर्ज फेडण्यासाठी हप्ते न भरता घेतलेली रक्कमही परत दिली नाही. बचत गटातील महिलांनी कर्ज फेडीचा तगादा लावल्याने दि. १८ मे रोजी वंदना कवाळे तिचा पती व दोन मुलांसह घर सोडून गायब झाल्याची तक्रार आहे. यामुळे सविता चौगुले व दहा ते बारा महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Women Flee After Taking Loan, Fraud Case Filed

Web Summary : A woman in Arag, Sangli, fled with her family after taking a nine-lakh loan from a self-help group, leading to a fraud case against four people for defrauding women members of ₹8.8 lakhs. Police investigation is underway.