शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: कौटुंबिक वादातून उचले टोकाचे पाऊल, महिलेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:37 IST

कुटुंबीयांनी सुचविलेले केलेले स्थळ पसंत नसल्याचे सांगत तिने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता

जत : सिंदूर (ता. जत) येथे महिलेने दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रविवार दि. १६ रोजी दुपारनंतर ही घटना घडली. प्रेमविवाहानंतर उद्भवलेल्या कौटुंबिक वादातून तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा घटनास्थळी होती. लक्ष्मी धानेश माडग्याळ (वय २३), दिव्या धानेश माडग्याळ (२) व नऊ महिन्याचा मुलगा श्रीशैल अशी मृतांची नावे आहेत.सिंदूर येथील लक्ष्मी माडग्याळ हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. कुटुंबीयांनी सुचविलेले केलेले स्थळ पसंत नसल्याचे सांगत तिने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यावेळी ती अल्पवयीन होती. कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याबाबत पोलिसांत तक्रारही दिली होती. लक्ष्मीच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघेही गावी परतले. त्यानंतर सिंदूरपासून चार किलोमीटरवर आढळहट्टी रस्त्यावरील धानेश याच्या शेतात दोघेही राहत होते. दरम्यानच्या काळात त्यांना मुलगी व मुलगा अशी दोन अपत्ये झाली.अल्पवयीन असतानाही प्रेमप्रकरणातून विवाहाबाबत पोलीस ठाण्यात दाखल प्रकरण मिटवण्यासाठी धानेश याने लक्ष्मीच्या आई-वडिलांना काही रक्कम दिली होती. या वादातून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. यातूनच तिने आत्महत्येचे मोठे पाऊल उचलले असावे अशी चर्चा होती.रविवारी दुपारी तिने विहिरीत उडी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शाेध सुरू केला. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने अडथळे येत हाेते. मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास नऊ महिन्यांच्या श्रीशैल याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर सांगाेला येथील बचाव पथकाने साेमवारी सकाळी लक्ष्मी व दिव्या यांचे मृतदेह बाहेर काढले.घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करून तीनही मृतदेहांची जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.

आठवड्यात दुसरी घटनागेल्या आठवड्यात बिळूर (ता. जत) येथील विवाहितेने तीन मुलींसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात सिंदूर येथे विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी