शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पटच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक, सांगलीतील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:23 IST

वारंवार पाठपुरावा करून पैशाची मागणी केली; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ

सांगली : सोळा महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनुजा अभिजित पवार (वय ४२, रा. शिवशक्ती कॉलनी, जयसिंगपूर) या महिलेची १० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत संशयित उमेश जगन्नाथ जोशी (वय ४५), अस्मिता जोशी (वय ४०, दोघेही रा. मुरली ॲपेक्स अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली) आणि संतोष सुधाकर पाठक (वय ५४, रा. श्री बंगला, दत्त मंदिरासमोर, यशवंतनगर, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी अनुजा पवार आणि संशयितांची ओळख होती. त्यांना विश्वासात घेऊन कमी कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून अनुजा पवार यांनी त्यांच्याकडील १० लाख १६ महिन्यांकरिता संशयितांकडे गुंतविले. फसवणुकीचा प्रकार दि. १५ सप्टेंबर २०२२ ते दि. ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडला. पैसे गुंतवूनदेखील त्यांना १६ महिन्यांत दामदुप्पट रक्कम न मिळाल्याने अनुजा पवार यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानंतर त्यांनी वारंवार संशयितांकडे पाठपुरावा करून पैशाची मागणी केली; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने अनुजा पवार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.